'... म्हणून बीएमसी टक्कापुरुषाला बसला धक्का'
शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांची टीका
मुंबई: प्रतिनिधी
मातोश्रीची काळी बाजू नीलमताईंनी उघड केल्यामुळे बीएमसी टक्कापुरुष उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे, अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या डॉ ज्योती वाघमारे यांनी ठाकरे यांच्यावर कठोर टीका केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतल्यावर दोन मर्सिडीज दिल्या की शिवसेनेत पद मिळत होते, असा आरोप विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी दिल्ली येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात केला होता. या विधानावरून राजकीय वर्तुळात वातावरण चांगलेच तापले आहे.
केवळ मर्सिडीज नव्हे तर रश्मी वहिनींच्या रेशमी साड्या आणि आदू बाळाची बाबा गाडी ही देखील पदाधिकाऱ्यांकडून खंडणी गोळा करून आणली होती का, असा उपरोधिक सवाल डॉ वाघमारे यांनी केला आहे. मन मोठे नसले तरी देखील रश्मी ठाकरे मोठ्या काठाच्या रेशमी साड्या परिधान करतात, असा टोला देखील त्यांनी लगावला.
महाराष्ट्रात ऊन वाढले की गुलाबी थंडीचा आनंद घ्यायला तुम्ही ज्या लंडनला जाता तिथल्या मालमत्ता कशा झाल्या हे तुम्ही महाराष्ट्राला सांगणार का? कोणताही कामधंदा न करता वयाच्या तिशीत आदित्य ठाकरे यांच्या करोडोंच्या मालमत्ता कुठून आल्या हे जनतेला सांगणार का? तुम्ही ज्या परदेशी गाड्या उडवता, त्या कुठून आल्या हे स्पष्ट करणार का, असे बोचरे सवाल डॉ वाघमारे यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून केले आहेत.
राणी तुम्हाला ले ना बँक म्हणतात तर राज ठाकरे तुम्हाला खोके नाहीतर कंटेनर लागतात असे म्हणतात. थिएटरच्या बाहेर जशी तिकिटांची दलाली चालते, तशी दलाली उद्धव ठाकरेंच्या पक्षात चालते, असा आरोप अनेक जणांनी केला आहे. या मागचे सत्य केव्हा उघड करणार, असा सवालह त्यांनी केला आहे.
Comment List