गिरीश महाजनच नाशिकचे पालकमंत्री
रायगडचा तिढा मात्र सुटेना
मुंबई: प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पराबाबत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील दावे प्रतिदाव्यांचा तिढा संपुष्टात आला असून हे पद भाजपकडे राहणार असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे गिरीश महाजन हेच नाशिकचे पालकमंत्री असणार आहेत. रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाबाबतचा पेच मात्र कायम आहे.
मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर राज्यात विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री नियुक्त करण्यात आले. मात्र, शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांना डावलून नाशिकचे पालकमंत्री पद गिरीश महाजन यांना दिल्याबद्दल शिंदे गटात नाराजी होती तर रायगड मध्ये शिंदे गटाचे भरत गोगावले यांच्या ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांना पालकमंत्री पद दिल्याबद्दल शिंदे गट नाराज होता. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला राज्य सरकारने स्थगिती दिली.
नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरील वादावर पडदा पडला असून भाजपने हे पद आपल्याकडेच राखले आहे. विशेषतः नाशिक येथे होणारा कुंभमेळा लक्षात घेता भाजप या पदाबाबत आग्रही आहे. त्यामुळे गिरीश महाजन हेच नाशिकचे पालकमंत्री राहणार आहेत, असे सूत्र मी सांगितले.
रायगडचा तिढा मात्र कायम आहे. या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाचा दावा आहे. या वादात भाजपची कोणतीही भूमिका नसल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परस्पर चर्चा करून या पदाबाबत निर्णय घ्यावा, अशी सूचना भाजपच्य केंद्रीय नेत्यांनी दिले आहेत.
Comment List