भव्य बिगर हुंडा सामूहिक विवाह सोहळा १५ मार्च रोजी

अग्रसेन भगवान चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने आयोजन

भव्य बिगर हुंडा सामूहिक विवाह सोहळा १५ मार्च रोजी

पुणे: प्रतिनिधी

अग्रसेन भगवान चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने दि. १५ मार्च २०२५ रोजी गरीब कुटुंबातील २५ जोडप्यांचा बिगर हुंडा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गंगाधाम रोडवरील आईमाता मंदिरासमोर असलेल्या गोयल गार्डन येथे होणाऱ्या या विवाह सोहळ्याचे आयोजन पुण्यातील सुप्रसिद्ध उद्योगपति रतनलाल हुकुमचंद गोयल यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित करण्यात आला आहे.

सामूहिक विवाह सोहळा हिंदू धर्मातील रितीरिवाज आणि धार्मिक परंपरांनुसार भव्य पद्धतीने करण्यात येणार आहे. या सोहळ्यात विवाह करणाऱ्या जोडप्यांना लाखो रुपयांच्या संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. या सोहळ्यात जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील अग्रवाल समाजासह इतर समाजातील गणमान्य व्यक्ती मिळून सुमारे ४ हजार नागरिक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राजेश अग्रवाल, रतनलाल गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या विवाह सोहळ्यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत रतनलाल गोयल यांच्यासह  विनोद जालान, विनोद अग्रवाल, राजेश अग्रवाल आदी उपस्थित होते. 

या वेळी बोलताना राजेश अग्रवाल म्हणाले की, अशाप्रकारचा सामूहिक विवाह सोहळा समाजातील दानशूर व्यक्तींच्या अनमोल सहकार्याने गरीब व गरजू कुटुंबीयांसाठी दरवर्षी आम्ही आयोजित करीत असतो. आजवर शेकडो जोडप्यांचे लग्न लावून देण्यात आलेले आहे. आज विवाह समारंभांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतात. सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील आई-वडिलांना हा खर्च पेलणे शक्य होत नाही. त्यामुळे बरीच कुटुंबे ही कर्जामध्ये बुडतात. सामूहिक विवाह सोहळ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होणारा खर्च वाचतो. त्यामुळे अशा परिस्थितीत सामूहिक विवाह सोहळे ही काळाजी गरज बनली असून, हीच खरी मानव सेवा आहे, अशी माहिती राजेश अग्रवाल व रतनलाल गोयल यांनी दिली.

दि. १५ मार्च रोजी होणाऱ्या विवाह सोहळ्यात लग्न करणाऱ्या जोडप्यांना विविध वस्तू जसेकि कपाट, पलंग, गादी, चादरी, टेबल, पंखा, मिक्सर, देवघर, भांडी, तसेच घरगुती कामाजाच्या विविध वस्तू मोठ्या प्रमाणावर दिल्या जाणार आहेत. याशिवाय वर-वधूचे कपड़े, वधूचे मंगळसूत्र, तोरड्या आणि जोडवेदेखील दिले जाणार आहेत.

उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, या विवाह सोहळ्यात  सुमारे 25 जोडप्यांनी नोंदणी केली असून, या भव्य-दिव्य सामूहिक विवाह सोहळ्याच्या आयोजनासाठी गोयल यांनी त्यांच्या मालकीचा गोयल गार्डन उपलब्ध करून दिलेला आहे. 

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us