'औरंगजेब नव्हे तर शिवाजी महाराज आमचे आदर्श'

योगगुरू बाबा रामदेव यांचे प्रतिपादन

'औरंगजेब नव्हे तर शिवाजी महाराज आमचे आदर्श'

नागपूर: प्रतिनिधी 

औरंगजेब हा आमचा आदर्श असूच शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हेच आमचे आदर्श आहेत, असे प्रतिपादन योग गुरु बाबा रामदेव यांनी केले. येथे पतंजलीच्या वतीने उभारण्यात आलेल्या फूडमार्ट उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर औरंगजेबाचे क्रौर्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून त्याबद्दल रागाची भावना पुन्हा उसळली आहे. अनेकांनी तर त्याची कयांनीरण्याची भाषा केली आहे. दुसरीकडे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब हा आदर्श राज्यकर्ता होता, असे विधान करून आधी तेल उठण्याचे काम केले आहे. या पार्श्वभूमीवर बाबा रामदेव यांनी यासंदर्भात आपले मत व्यक्त केले. 

औरंगजेब हा कधीच आपला आदर्श होऊ शकत नाही. त्याचे खानदान लुटारूंचे होते. बाबराच्या आक्रमणापासून हजारो वर्ष त्यांनी भारताला लुटण्याचे काम केले आहे. हजारो महिलांवर अत्याचार केले आहेत. अर्थातच ते आपले आदर्श नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज हेच आपले आदर्श आहेत, असे रामदेव बाबा यांनी नमूद केले. 

हे पण वाचा  महाड मध्ये भीमसृष्टी उभारणार..!

कॅलिफोर्निया येथे मंदिरावर झालेल्या हल्ल्याचाही त्यांनी निषेध केला. सध्या जगभरातच धार्मिक मूलतत्त्ववाद, दहशतवाद फोफावला असून  अमेरिका आणि युरोपमधल्या देशांतही भारतीयांना लक्ष केले जात आहे. धार्मिक कट्टरतावाद आणि दहशतवादावर माफ करण्यासाठी सर्व देशांनी संघटित प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. 

ट्रम्प हे देखील आर्थिक दहशतवादी 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हस्तगत करताच कर दहशतवाद (tariff terrorism) सुरू केला आहे. डॉलरची किंमत वाढवून गरीब देशांच्या चलनांची किंमत कमी केली आहे. ट्रम्प, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग हे बेभरवशाचे नेते आहेत. हे शक्तिशाली देश जगाला विनाशाकडे नेऊ पाहत आहेत. त्यांना समर्थपणे तोंड देण्यासाठी एकजुटीने समर्थ राष्ट्राची उभारणी केली पाहिजे, अशी अपेक्षा रामदेव बाबांनी व्यक्त केली. 

शेतकऱ्यांना समृद्धी प्रदान करणार 

पतंजलीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या फूडमार्टमध्ये फळांचा ताजा ज्यूस तयार केला जाणार आहे. या प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन आठशे टन एवढी आहे. यामुळे विदर्भातील संत्री उत्पादक शेतकऱ्यांना समृद्धी मिळणार आहे. संत्र्याचे उत्पादन वाढवण्यासाठी सशक्त रोपे तयार करणारी नर्सरी पतंजलीच्या वतीने सुरू केली जाणार आहे. कालांतराने इतर फळांची रोपेही विकसित केली जाणार आहेत, असेही रामदेव बाबा यांनी सांगितले. विदर्भाला लागून असलेल्या मध्यप्रदेश आणि राजस्थान सारख्या राज्यांतील शेतकऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे असल्याचा दावाही त्यांनी केला. जय जवान, जय किसानच्या बरोबरीने जय मिहानचे महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, असेही ते म्हणाले. 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

पिंपरी - चिंचवड स्मार्ट सिटी आणि महापालिका इंटीग्रेटेड  सॉफ्टवेअर वर्षाअखेरीस कार्यान्वित पिंपरी - चिंचवड स्मार्ट सिटी आणि महापालिका इंटीग्रेटेड  सॉफ्टवेअर वर्षाअखेरीस कार्यान्वित
  मुंबई : स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार 50 टक्के आणि राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था प्रत्येकी 25 टक्के
'भारतातील जनता नाही तर नेतेच जातीयवादी'
'सुशांतसिंग राजपूतची हत्या नव्हे तर आत्महत्याच'
पुणेकरांचे प्रेम कधीही विसरू शकत नाही - अशोक सराफ
समाजाचा ढळलेला तोल सावरण्यासाठी श्री स्वामी समर्थांचे स्मरण आवश्यक!
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर पळून जाताना पोलीस झोपले होते का? : हर्षवर्धन सपकाळ
औंध रुग्णालयाच्या आवारात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारावे

Advt