सतीश भोसले उर्फ खोक्याला सात दिवसांची पोलीस कोठडी
बीड येथील शिरूर न्यायालयाचे आदेश
On

बीड: प्रतिनिधी
अमानुष मारहाण प्रकरणी आरोपी असलेला आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या याची बीड येथील शिरूर न्यायालयाने सात दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
खोक्या याच्या दुष्कृत्यांचे व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्या अटकेच्या मागणीने जोर धरला. त्यानंतर तो फरार झाला होता. बीड मधून तो पुणे, अहिल्यादेवी नगर मार्गे प्रयागराज येथे केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बीड पोलिसांचे पथक प्रयागराज येथे रवाना झाले आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने त्यांनी खोक्याला ताब्यात घेतले.
त्यानंतर त्याला प्रयागराज येथून विमानाने छत्रपती संभाजीनगर येथे आणि तिथून पुढे बीडला आणून शिरूर न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे..
Tags:
Comment List