'स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही'
कुणाल कामरा याला मुख्यमंत्र्यांनी फटकारले
मुंबई: प्रतिनिधी
स्टँड अप कॉमेडी करण्याचे स्वातंत्र्य सगळ्यांना आहे. मात्र, स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ नये याची जाणीव कुणाल कामाला असली पाहिजे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टँड अप कॉमेडीयन कुणाल कामरा याला फटकारले आहेयांनी
कुणाल याने एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक व्यंगात्मक गीत सादर केले. यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी कोणाच्या स्टुडिओची तोडफोड केली. यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, तोडफोड करणाऱ्यांकडून नुकसान भरपाई वसूल करावी, अशी मागणी केली आहे.
या प्रकारावर प्रतिक्रिया व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सन 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेने ठरवले आहे. हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार कोण हे जनतेला उमगले आहे. कॉमेडीच्या नावाखाली जनतेला ज्यांच्याबद्दल आदर आहे त्यांचा अनादर करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर ते सहन केले जाणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.
कुणाल कामरा हे संविधान बरोबर घेऊन फिरतात. त्यांना संविधानाबद्दल माहिती असणार. स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ नये, हे संविधानाने सांगितले आहे. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर कोणी अतिक्रमण करू शकत नाही, असेही फडणवीस म्हणाले.