जुन्या शाही कार्स आणि बाईक रसिकांसाठी पर्वणी

विंटेज व क्लासिक कार्स प्रदर्शन शनिवार दि. २९  व रविवार दि. ३० मार्च रोजी

जुन्या शाही कार्स आणि बाईक रसिकांसाठी पर्वणी

पुणे: प्रतिनिधी 

मागील शतकातील दुर्मिळ व नामवंत व्यक्तींनी वापरलेल्या विंटेज अँड क्लासिक कार्स यांचे अनोखे प्रदर्शन ‘विंटेज अँड क्लासिक कार/मोटर सायकल एनवल फिएस्टा २०२५’ याचे प्रदर्शन पुण्यात शनिवार दि. २९ व रविवार दि. ३० मार्च २०२५ या दोन दिवशी रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब, पुणे येथे भव्यतेने  आयोजन करण्यात आले आहे. या भव्य सोहळ्यात पुण्याच्या समृद्ध ऑटोमोटिव्ह वारशाचा अद्वितीय उत्सव साजरा केला जाणार आहे. शनिवारी दि. २९ रोजी सकाळी १०.०० वाजता या प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन होईल.  हे प्रदर्शन दुर्मिळ आणि ऐतिहासिक वाहनांची अनोखी झलक सादर करणारअसून, नागरिकांसाठी शनिवारी व रविवारी या दिवशी हे प्रदर्शन विनामुल्य खुले असणार आहे अशी माहिती विंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडियाचे चेअरमन नितीन डोसा (मुंबई) यांनी पत्रकार परिषदेत  दिली. 

याप्रसंगी सुभाष.बी.सणस विंटेज अँड क्लासिक कार म्युझियमचे सुभाष सणस, वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन (WIAA)चे अध्यक्ष प्रकाश कुलकर्णी,  सरचिटणीस अर्णव एस., माजी सरचिटणीस सुभाष गोरेगावकर, मिशेलिन इंडिया आणि एन मेहता कंपनीतर्फे निशांत मेहता उपस्थित होते. पुण्याचे पहिले महापौर कै. बाबुराव सणस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या प्रदर्शनात सर्वोत्कृष्ट व्हिंटेज कारला विशेष ट्रॉफी देण्यात येणार आहे.   

हा फिएस्टा मिशेलिन इंडिया आणि एन एम टायर्स हे मुख्य प्रायोजक असूनरॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब (RWITC) यांचे सहप्रायोजकत्व आहे. तसेचमहाराष्ट्र पर्यटन विभागाच्या सहकार्याने आणि वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन (WIAA) यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा संपन्न होणार आहे.

हे पण वाचा  पुण्यात होणार सर्वात मोठा ग्लोबल एज्युकेशन फेअर

या प्रदर्शनात १०० दुर्मिळ आणि अमूल्य विंटेज व क्लासिक कार्स तसेच १०० विंटेज स्कूटर्स आणि मोटरसायकल्स यांचा सहभाग असणार आहे. वाहनप्रेमी आणि संग्राहकांसाठी हे प्रदर्शन ऐतिहासिक ऑटोमोटिव्ह कारागिरीचा अभूतपूर्व अनुभव देणारे ठरणार आहे.

या प्रदर्शनाला केवळ पुण्यातूनच नव्हेतर मुंबईतील विंटेज कार्सचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण म्हणजे बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील नामांकित व्यक्तींनी वापरलेल्या विंटेज आणि क्लासिक गाड्यांचा अप्रतिम संग्रह असणार आहे. मुंबईचे अब्बास जसदानवाला यांची भारतातील सर्वात जुनी  धावणारी १९०३ची कार हंबर ही विशेष आकर्षण असणार आहे. सुभाष सणस यांच्या मालकीच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आणि कुटुंबीयांनी वापरलेली डॉज किंग्सवेमाजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वापरलेली कन्व्हर्टेबल इंपाला,  हॉलिवूड स्टार अल पचिनो यांची मर्सिडीज बेंझअमिताभ बच्चन यांची व्हाइट मर्सिडीजविनोद खन्ना यांची 2 डोअर सिल्व्हर कलर मर्सिडीज, बाळासाहेब ठाकरे यांनी वापरलेली २००९ मर्सिडीज-बेंझअभिनेते चंकी पांडे यांच्या मालकीची १९८२ची 2 डोअर स्पोर्ट्स मर्सिडीज-बेंझब्रुनेईचे राजे यांची १९८१ मर्सिडीज-बेंझ लिमोझिनजर्मन पोलिस प्रमुखांनी वापरलेली १९८२ मर्सिडीज-बेंझ, तसेच नितीन डोसा यांच्याकडील १९५२ची क्रायस्लर कन्व्हर्टिबल एक्स जीयुव्ही मद्रास, यश रुईया यांच्या कडील १९४७ एमजी  व इतर सेलिब्रिटीज यांच्या विंटेज कार्स तसेच ‘बॉबी’ फेम राजदूत मोटार सायकल अशा अनेक वाहनांचा समावेश आहे.  

या व्यतिरिक्तपेबल्स बीच यूएसए विजेता एल्विसची 1933शेखर सावडेकर यांची जुनी कार 1919 ओव्हर लँड1956 ची डॉज१९३८ ची सर्वात जुनी मोटारसायकल नॉर्टन 500, ऑस्टिन 7 इत्यादी प्रदर्शित केले जातील. रोल्स रॉईस, बेंटली, मर्सिडीज बेंझ, शेवरलेट, मॉरिस कन्वर्टिबल, ऑस्टिन, फोर्ड व इतर फॉरेन कार्स यांचा यात समावेश आहे.

धनंजय बदामीकर, डहाणूकर, योहान पूनावाला, झहीर वकील, साबळे कुटुंबमुंबईचे नितीन डोसा, यश रुईया अशा अनेकांच्या संग्राह्तील या विंटेज व क्लासिक कार्स आहेत. पुणेकरांनी या भव्य प्रदर्शनासाठी यावे आणि या विंटेज अँड क्लासिक कार प्रदर्शनाचा आनंद घ्यावाअसे आवाहन नितीन डोसा आणि सुभाष सणस यांनी केले असूनपुणेकरांनी या अद्वितीय विंटेज आणि क्लासिक कार प्रदर्शनाची भव्यता अनुभवावीअसे त्यांनी निमंत्रण दिले आहे.

हे फिएस्टा देशभरातील अतिशय प्रतिष्ठित आणि सुस्थितीत असलेल्या विंटेज वाहनांचे दर्शन घडवण्यासाठी वाहनप्रेमींना एक आगळा-वेगळा मंच उपलब्ध करून देणार आहे.

हे फिएस्टा भारताच्या समृद्ध वाहन परंपरेला दिलेली आदरांजली आहे. विंटेज आणि क्लासिक वाहनांच्या या अद्वितीय संग्रहाला एकत्र आणण्याचा आनंद आम्हाला होत असूनत्यांची शाश्वत मोहकता आणि अभियांत्रिकी कौशल्य साजरे करण्याची ही अनोखी संधी आहे.

विंटेज आणि क्लासिक कार/मोटरसायकल एनवल फिएस्टा २०२५ या भव्य सोहळ्यास वाहन संग्राहकउद्योग तज्ज्ञ आणि उत्साही वाहनप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. मोटारिंग संस्कृतीशी असलेले पुण्याचे दृढ नाते लक्षात घेताहे आयोजन वाहन इतिहास आणि भव्यतेचे अप्रतिम दर्शन घडवणारे ठरणार आहे.

वेबसाईट - https://www.vccci.in/29th-30th-march-2025/

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

ईदची नको, हवी न्यायाची भेट! ईदची नको, हवी न्यायाची भेट!
स्थित्यंतर / राही भिडे हिंदू, इस्लामसह अन्य धर्मातही असे मानले जाते की इतरांना, विशेषतः दुर्बलांना मदत केल्याने पुण्य मिळते. त्यामुळे...
नाट्य परिषद कोथरूड शाखेने उभारली सांस्कृतिक कलावंत गुढी
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला नव्या संचातील 'तुझे आहे तुजपाशी'चा  रौप्यमहोत्सवी प्रयोग सादर
लष्करी अधिकाऱ्याकडून लष्करी अधिकाऱ्याचीच फसवणूक
ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख शिंदे गटात डेरेदाखल
खंडणी आणि खुनाबाबत प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा महत्त्वाचा जबाब
महाराष्ट्र बँक सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेकडून सामाजिक कृतज्ञता निधी समर्पण

Advt