'... ही अभिव्यक्ती नव्हे तर सुपारी घेऊन केलेला स्वैराचार'

कुणाल कामरा याच्या गाण्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

'... ही अभिव्यक्ती नव्हे तर सुपारी घेऊन केलेला स्वैराचार'

मुंबई: प्रतिनिधी

कुणाल कामरा याने केलेले गाणे ही कलेची अभिव्यक्ती नाही तर कोणाकडून तरी सुपारी घेऊन केलेला स्वैराचार आहे. व्यभिचार आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणाल कामरा याच्या वादग्रस्त गाण्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

कुणाल कामरा याने एका कार्यक्रमात शिवसेना फुटीच्या पार्श्वभूमीवर एक विडंबनात्मक गाणे सादर केले होते. या गाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करण्यात आले असून त्यामुळे त्यांचा अपमान झाल्याची भावना शिवसैनिकांमध्ये आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी कुणाल यांनी गाणे ज्या ठिकाणी गायले त्या हॉटेलमधील स्टुडिओची मोडतोड केली आहे. या प्रकारामुळे राज्यभर खळबळ माजली आहे. 

अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलेच पाहिजे. मात्र, कुणाल चे गाणे ही कलेची अभिव्यक्ती नाही. कोणाकडून तरी सुपारी घेऊन त्याने हा प्रकार केला आहे. यापूर्वी अनेकांनी टीका केली अनेकांनी विडंबन केले. त्याबद्दल आपण प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. आरोप आणि टीकेला कामातून उत्तर देणे ही आपली पद्धत आहे, असेही शिंदे म्हणाले. 

हे पण वाचा  'सुशांतसिंग राजपूतची हत्या नव्हे तर आत्महत्याच'

कुणालने आपल्यावर टीका करणारे गाणे हॉटेलमधील ज्या स्टुडिओत गायले त्या स्टुडिओची शिवसैनिकांनी तोडफोड केली. आपण निश्चितपणे या प्रकाराचे समर्थन करीत नाही. मात्र, कुणालच्या कृतीवर शिवसैनिकांनी व्यक्त केलेली ती संतप्त प्रतिक्रिया होती, असेही शिंदे यांनी नमूद केले. 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख शिंदे गटात डेरेदाखल ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख शिंदे गटात डेरेदाखल
पुणे: प्रतिनिधी  विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणावर गळती लागली असून नुकताच ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख आनंद...
खंडणी आणि खुनाबाबत प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा महत्त्वाचा जबाब
महाराष्ट्र बँक सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेकडून सामाजिक कृतज्ञता निधी समर्पण
'मालवणी पोलिसांचा अहवाल तत्कालीन सरकारच्या दबावाखाली?'
भारतीय सैन्याने बनवला दुश्मनांचा कर्दनकाळ
'सण उत्सव हे समाजात एकोपा निर्माण करण्याचे प्रभावी साधन'
मद्यपानाचे व्यसन लपविल्यास मिळणार नाही विम्याची रक्कम

Advt