विधिमंडळाच्या रोजगार हमी योजना समितीच्या प्रमुखपदी आमदार सुनिल शेळके यांची नियुक्ती...
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून नव्या योजना आणण्याचा माझा मानस; आमदार सुनील शेळके
वडगाव मावळ प्रतिनिधी
मावळचे आमदार सुनिल शेळके यांची महाराष्ट्र विधिमंडळ रोजगार हमी योजना समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
*सुनिल शेळके यांचा अनुभव आणि भुमिका*
सुनिल शेळके हे सामाजिक कार्यात सक्रिय असून, मागील काही वर्षांपासून त्यांनी ग्रामीण भागातील भौतिक सुविधा रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली रोजगार हमी योजनेत ठोस उपाययोजना व नवीन प्रकल्प राबवले जातील, मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांन कडून त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे रोजगार हमी योजनेला नवी दिशा मिळेल, अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

*रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी काही बदल आवश्यक*...
आमदार सुनिल शेळके यांच्या अध्यक्षतेखाली पुढील महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे:
- ग्रामीण भागातील नवीन रोजगार प्रकल्पांना गती
- कामगारांना वेतनवाढ आणि सोई सुविधा
- नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्नशील
- पारदर्शकता आणि वेगवान अंमलबजावणी
निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना आमदार सुनिल शेळके म्हणाले, "ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना रोजगार मिळावा आणि त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे, यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून नव्या योजना आणण्याचा माझा मानस आहे."
*रोजगार हमी योजना समिती*
या समितीचे प्रमुख आमदार सुनिल शेळके असून सदस्य म्हणून डॉ. संजय कुटे, डॉ. सुरेश खाडे, अमोल जावळे, विजयकुमार देशमुख, राजेश बकाने, हरिष पिंपळे, विनोद अग्रवाल, महेश चौघुले, राजेश वानखडे, विश्वनाथ भोईर, आमश्या पाडवी, शांताराम मोरे, हिकमत उढाण, काशिनाथ दाते, शंकर मांडेकर, संजय देरकर, नितीन देशमुख, शिरीषकुमार नाईक आणि बापूसाहेब पठारे यांचा समितीत समावेश आहे.
महाराष्ट्र विधानसभा सचिव जितेंद्र भोळे यांच्या स्वाक्षरीने या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री,व नेत्यांकडून अभिनंदन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व एकनाथ शिंदे तसेच इतर वरिष्ठ नेत्यांनी सुनिल शेळके यांचे अभिनंदन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
*विधिमंडळाच्या विविध समित्यांचे प्रमुख व सदस्यांची नियुक्ती*
महाराष्ट्र विधिमंडळाच्या विविध समित्यांचे समिती प्रमुख व सदस्यांची नामनियुक्ती करण्यात आली आहे. यात अंदाज समिती, लोकलेखा समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, पंचायत राज समिती, रोजगार हमी योजना समिती, उपविधान समिती, अनुसूचित जाती कल्याण समिती, अनुसूचित जमाती कल्याण समिती, विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती, महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती, इतर मागासवर्ग कल्याण समिती, अल्पसंख्यांक कल्याण समिती, मराठी भाषा समिती, विशेष अधिकार समिती, विनंती अर्ज समिती, आश्वासन समिती, नियम समिती, सदस्य अनुपस्थिती समिती, अशासकीय विधेयके व ठराव समिती, सभागृहाच्या पटलावर कागदपत्रे ठेवण्याबाबत तदर्थ समिती, सदस्यांचे वेतन व भत्ते समिती, विधिमंडळाच्या माजी सदस्यांच्या निवृत्तीवेतनाबाबत संयुक्त समिती, ग्रंथालय समिती, आमदार निवास व्यवस्था समिती, आहार व्यवस्था समिती, धर्मादाय खासगी रुग्णालयांची तपासणी करणे संदर्भातील समिती, विधानमंडळ सदस्यांचा समावेश असलेले एड्स चर्चापीठ, वातावरणीय बदलासंदर्भात संयुक्त तदर्थ समिती यांचा समावेश आहे.
About The Author
