'एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी विविध योजनांवर विचार सुरू'

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची ग्वाही

'एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी विविध योजनांवर विचार सुरू'

पुणे: प्रतिनिधी 

राज्य परिवहन महामंडळाला राज्य शासनाकडून वारंवार मदत केली जात असून एसटीचे उत्पन्न वाढावे यासाठी विविध उपाय योजनांवर विचार केला जात आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. 

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या वेतनाची पूर्ण रक्कम मिळाली नाही. वेतनापैकी केवळ 56 टक्के रक्कम कर्मचाऱ्यांना मिळाली असून 44 टक्के रक्कम मिळालेली नाही. या संदर्भात अजित पवार यांना विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाबाबत माहिती घेऊन पुढील कारवाई करू, असे आश्वासनही पवार यांनी दिले. 

देशातील कोणतीही सार्वजनिक प्रवासी वाहतूक संस्था फायद्यात नसते. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना किफायतशीर दरात प्रवास करता यावा त्यासाठी अशा संस्था महत्त्वाच्या असतात. त्यामुळे राज्य शासनाकडून एसटी महामंडळाला वारंवार मदत केली जाते, असे पवार यांनी स्पष्ट केले.

हे पण वाचा  'पीएसआय अर्जुन'च्या गाण्याला 'पुष्पा फेम' नकाश अजीज यांचा आवाज

करोना काळात प्रवासी वाहतूक पूर्णपणे ठप्प असताना देखील राज्य शासनाने एसटी महामंडळाला अडीचशे ते तीनशे कोटी रुपये दिले आहेत. मोफत प्रवासाच्या विविध सवलतींच्या पोटी राज्य शासनाकडून एसटी महामंडळाला निधी दिला जातो. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येते, असेही पवार यांनी सांगितले. 

एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाय योजनांवर विचार सुरू आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ई बसेस खरेदीचा प्रस्ताव दिला आहे या प्रस्तावाला मान्यता दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे एसटी महामंडळाच्या मोठ्या जागा विविध शहरांमध्ये मध्यवर्ती ठिकाणी आहेत. या जागा व्यावसायिक बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्त्वावर देण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी साठ वर्षाचा दीर्घकालीन करार केला जाईल. त्यानंतर हा करार आणखी 30 वर्ष वाढवला जाईल. त्यातून एसटी महामंडळाला मोठे उत्पन्न मिळू शकेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. 

महात्मा फुले स्मारकाचे राजकारण नको 

राज्य शासनाच्या वतीने महात्मा फुले यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या स्मारकावरून राजकारण केले जाऊ नये, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली. या संदर्भात छगन भुजबळ यांची भेट घेणार असून त्यांना उपोषण करावे लागणार नाही, याची ग्वाही देणार आहे, असेही पवार यांनी सांगितले. 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

पुणेकर विद्यार्थिनी शिवका खरे हिची आयआयएमए अहमदाबाद येथे प्रशिक्षणासाठी निवड  पुणेकर विद्यार्थिनी शिवका खरे हिची आयआयएमए अहमदाबाद येथे प्रशिक्षणासाठी निवड 
पुणे: प्रतिनिधी  व्यवस्थापन क्षेत्रात प्रशिक्षण देणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठित अशा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद या संस्थेत प्रशिक्षणार्थी म्हणून पुणेकर विद्यार्थिनी...
‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम
'आम्ही पोसत होतो दहशतवादी, मात्र तो भूतकाळ आहे'
'आता सर्जिकल स्ट्राइक नको तर थेट सर्जरीच हवी'
पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर लाखो सायबर हल्ले
पाकिस्तानमध्ये 'दीपेंद्रसिंह हुड्डा' या नावाची वाढती दहशत
'वेचून वेचून बदला घेऊ, कुणालाही सोडणार नाही'

Advt