पाकिस्तानने पायावर मारून घेतली कुऱ्हाड
पाण्याच्या प्रश्नावरून ओढवून घेतले भारताशी युद्ध
नवी दिल्ली: प्रतिनिधी
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये झालेल्या सिंधू जल वाटप कराराला स्थगिती देऊन भारताने त्याची अंमलबजावणी ही सुरू केली आहे. त्यानुसार चिनाब नदीचे पाणी भारताने अडवले आहे. त्यामुळे पाकिस्तानची पाणी कोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी संसदेने भारताचे पाणी अडवणे याला युद्ध पुकारणे ठरवले आहे. त्यामुळे अर्थातच पाकिस्तानने भारताबरोबर युद्ध सुरू झाले आहे असे गृहीत धरल्याचे दिसून येते.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय नागरिक बळी पडले. त्यानंतर भारताने सिंधू जलवाटप करार स्थगित केला. त्याची अंमलबजावणी आता सुरू केली असून चिनाव नदीचे पाकिस्तानात जाणारे पाणी रोखण्यात आले आहे. पाकिस्तानचे पाणी रोखणे हे युद्धच असल्याचा आरोप पाकिस्तानन केला आहे. अर्थात भारताने पाणी रोखल्यामुळे पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले तर ते समर्थनीय आहे असा त्यांचा दावा आहे. हा दावा करून पाकिस्तानने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे.
भारताने केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानी संसदेने युद्धजन्य परिस्थितीचा पुकार करून भारताला युद्ध करण्यास मोकळे मैदान दिले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान वारंवार भारताला युद्धाच्या आणि अणुबॉम्बच्या धमक्या देत असला तरी देखील भारताने याबाबत अतिशय संयम बाळगला आहे. युद्धखोरीची भाषा ही पाकिस्तान कडूनच केली जात आहे. त्यावरून युद्धाची खुमखुमी भारतापेक्षा पाकिस्तानलाच आहे हे दिसून येत आहे. नियंत्रण रेषेवर वारंवार गोळीबार करून पाकिस्तान युद्धबंदीचा. भंग करीत आहे. अर्थात भारत पाकिस्तानचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही ही बाब स्पष्ट आहे.