- राज्य
- रिपब्लिकन पक्षाची (आठवले) पुणे शहर कार्यकारणी बरखास्त
रिपब्लिकन पक्षाची (आठवले) पुणे शहर कार्यकारणी बरखास्त
महापालिका निवडणूक नजरेसमोर ठेवून होणार पदाधिकाऱ्यांची फेरनिवड
On
पुणे : प्रतिनिधी
रिपब्लिकन पक्ष (आठवले) ची पुणे शहरातील विशेष कमिटीची बैठक शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. सदरच्या बैठकीमध्ये पुणे शहर कार्यकारणी बरखास्त करण्यात आली. संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच फेरनिवड करण्यात येणार आहे.
आगामी महानगरपालिका निवडणूक डोळयासमोर ठेवून संघटनात्मक बांधणी करण्याकरीता एकमताने निर्णय घेण्यात आला असून येत्या पंधरा दिवसात नवीन कार्यकारणीची निवड करण्यात येणार आहे, असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.
या बैठकीस परशुराम वाडेकर, रोहिदास गायकवाड, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, शैलेंद्र चव्हाण, मोहन जगताप, महिपाल वाघमारे, बसवराज गायकवाड, शाम सदाफुले, रफिक दफेदार, महेंद्र कांबळे, भगवान गायकवाड, वसंत बनसोडे, हिमाली कांबळे, महादेव दंदी, बाळासाहेब जगताप, विरेन साठे, संदिप धांडोरे आदि उपस्थित होते.
About The Author
Related Posts
Latest News
18 Jul 2025 19:58:06
मुंबई: प्रतिनिधी
हिंदी सक्तीला विरोध आणि मराठी अस्मितेच्या प्रश्नावर राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आपला शिवसेना ठाकरे गट...