चोराच्या उलट्या बोंबा, घाबरलेल्या पाकिस्तानचा कांगावा
दहशतवादी तळांवर नव्हे तर नागरी भागात हल्ले केल्याचा दावा
नवी दिल्ली: प्रतिनिधी
भारताने हल्ला करून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानने उलट्या बोंबा मारण्यास सुरुवात केली आहे. भारत आणि नऊ नव्हे तर सहा ठिकाणी हल्ला केला. हे हल्ले झालेल्या ठिकाणी दहशतवाद्यांचे तळ नव्हते तर नागरी भागात हे हल्ले झाले आहेत, असा कांगावा पाकिस्तानने सुरू केला आहे.
भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ले करून केवळ 25 मिनिटात दहशतवाद्यांचे नऊ तळ उध्वस्त केले आहेत. पहलगाम हल्ल्यातील मृत व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी हे हल्ले केल्याचे भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मात्र, पाकिस्तानने भारताकडून झालेले हल्ले नागरी भागात झाल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यामध्ये आमचे 26 नागरिक मरण पावले असून 46 जण जखमी झाल्याचा दावा पाकिस्तानन केला आहे. कहर म्हणजे पाकिस्तानी सैन्याने भारताची पाच लढाऊ विमाने जमीनदोस्त केल्याचा पोकळ दावा देखील पाकिस्तानकडून केला जात आहे.