Ladki Bahin Yojna | लाडक्या बहिणींनो बँक खातं तपासा, दीड हजार रुपये येण्यास सुरुवात-आदिती तटकरे

Ladki Bahin Yojna | लाडक्या बहिणींनो बँक खातं तपासा, दीड हजार रुपये येण्यास सुरुवात-आदिती तटकरे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं असून या योजनेतील सन्माननिधीच्या वितरणाला आजपासून सुरुवात झाली आहे. अनेकांच्या खात्यात पैसे जमा झाले असून आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात हे पैसे जमा झालेत की नाही हे तपासण्याचं आवाहन केलं जात आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भातील एक्सवर माहिती दिली आहे.

गेल्यावर्षी जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्याचे आश्वासित करण्यात आले. त्यानुसार, ऑगस्ट महिन्यापासून हा लाभ पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. ऑक्टोबर महिन्यापर्यंत सरकारने या योजनेसाठी महिलांना अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरले आणि पात्रही झाले. एप्रिल महिन्यापर्यंत महिलांना १० हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत, तर मे महिन्याचा ११ वा हप्ताही महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

एप्रिल महिन्याचा हप्ता गुढीपाडव्यापासून देण्यात आला होता. त्यामुळे मे महिन्याचाही हप्ता मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, मे महिना उलटला तरीही हप्ता खात्यात जमा न झाल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली. त्यातच, छाननी प्रक्रिया सुरू झाल्याने आपलाही अर्ज बाद झाला की काय अशी शंका अनेक पात्र महिलांना वाटू लागली. दरम्यान, जानेवारी महिन्यापासून अनेक पात्र महिलांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून यामधून जवळपास लाखो सरकारी कर्मचारी महिलांचे अर्ज बाद ठरवण्यात आले आहेत. तर, विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही अपात्र करण्यात आलं आहे. या छाननी प्रक्रियेतून यशस्वी ठरलेल्या पात्र महिलांच्या खात्यात आता दीड हजार रुपये जमा केले जात आहे.

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे. महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे”, असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या.

000

About The Author

Advertisement

Latest News

'भारत-पाक संघर्षात विजयाची संधी का दवडली?' 'भारत-पाक संघर्षात विजयाची संधी का दवडली?'
पुणे : प्रतिनिधी भारत - पाकिस्तान संघर्षादरम्यान भारताने पाकिस्तानला धडा शिकवायची संधी का दवडली? पाकिस्तानवर वर्चस्व मिळवण्याची संधी का सोडली,...
शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा स्मरण करून सर्वांनी पुढे गेले पाहिजे-उपमुख्यमंत्री अजित पवार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी दिली बार्टी संस्थेस भेट
दिव्यांगाची परवड थांबणार कधी; दिव्यांग व्यक्ती संघटनेचे पदाधिकारी ज्ञानदेव कदम!
नॅशनल पार्क झोपडीवासीयांचा वनवास २५ वर्षे झाली तरी संपेना 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन साजरा  
स्वेच्छेने केलेल्या धर्मांतराला विरोध नसावा: सरसंघचालक

Advt