The Democrat | Editorial

लष्करातील महिलांची वाटचाल!

स्थित्यंतर राही भिडेभारतीय लष्करात महिलांची भूमिका काळानुसार बदलत आहे. राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) मधून अलिकडेच १७ महिला कॅडेट्स पदवीधर होणे हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. या प्रतिष्ठित अकादमीतून महिलांनी प्रशिक्षण पूर्ण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. लष्करात स्री पुरूष...
संपादकीय 
Read More...

सतर्कतेची आवश्यकता

‘ऑपरेशन सिंदूर’ च्या यशात आपण आत्ममग्न आहोत. पाकिस्तानला आपण कसा धडा शिकवला, याचे ढोल वाजवले जात असताना दक्षिण आशियातील काही हालचाली आपली डोकेदुखी वाढवणाऱ्या आहेत. त्याकडे दुर्लक्ष करणे आपल्याला परवडणारे नाही.
संपादकीय 
Read More...

वळणाचे बळी! ..

मुंबई उपनगरीय रेल्वेचे अपघात नवीन नाहीत. हजारो प्रवाशांचा बळी जाऊनही रेल्वे प्रशासनाला शहाणपण सुचत नाही. पूर्वीचेच प्रयोग पुन्हा पुन्हा केले जात आहेत. अपघातासाठी दिली जात असलेली कारणे जशी काही नव्यानेच निर्माण झाली आहेत. अपघात झाल्याशिवाय उपाययोजना करायच्याच नाहीत, ही मानसिकता आणि प्रवाशांच्या मृत्यूशी आपला काहीही संबंध नाही, अशी असंवेदनशील वृत्ती प्रवाशांच्या जखमांवर मीठ चोळणारी आहे.
संपादकीय 
Read More...

महत्त्वाकांक्षेचा चिराग!

बिहार विधानसभेच्या निवडणुका चार-पाच महिन्यांत होणार आहेत. त्यासाठी राजकीय पक्षांनी व्यूहरचना सुरू केल्या आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत निवडणुकीपूर्वीच फूट पडली आहे. केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील लोक जनशक्ती पक्षाने विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे जाहीर केले आहे. त्यांचा हा निर्णय भाजपच्या सूचनेनुसार घेतला, की त्यांना मुख्यमंत्री होण्याची घाई झाली आहे, हे कळण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागेल.
संपादकीय 
Read More...

अमेरिकेतील जंग!

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती तसेच ट्रम्प यांचे एकेकाळचे जीवलग मित्र एलन मस्क यांच्यातील मैत्रीने आता शत्रुत्वाचे रुप घेतले आहे. त्यांच्यात पराकोटीचा दुरावा निर्माण झाला असून एकमेकांच्या साम्राज्याला ते आव्हान द्यायला निघाले आहेत. ट्रम्प यांचा एककल्ली आणि एकाधिकारशाहीचा कारभार पाहता मस्क यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागेल, तर मस्क हे ट्रम्प यांचे किती राजकीय नुकसान करतात, हे पाहावे लागेल.
संपादकीय 
Read More...

विकासाला हवा मानवी चेहरा

स्थित्यंतर / राही भिडेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने सरकारने आपली पाठ थोपटून घेतली नाही तरच नवल. देशभर कार्यक्रम आणि संकल्प सिद्धी यात्रा सुरू झाल्या आहेत. मोदी यांच्या काळात देश कसा बदलला, भारताचे...
संपादकीय 
Read More...

बाबासाहेबांचे निष्ठावंत अनुयायी "हरिभाऊ तोरणे"

तोरणे, हरी भाऊ : (१७ जुलै १८९२ – १७ जुलै १९६९). महाराष्ट्रातील प्रसिद्ध सत्यशोधक जलसाकार, भीमभूपाळीकार, परिवर्तनवादी लेखक. महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्ती चळवळीत त्यांनी प्रत्यक्ष सक्रीय कार्य केलेले आहे. तोरणेमास्तर अथवा...
संपादकीय 
Read More...

परिवारवादाचा पुन्हा सूर!

बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांच्या दौऱ्यात परिवारवादावर टीका केली. भाजपच्या कार्यकर्त्यांना परिवारवादाचा त्याग करण्याचा सल्ला त्यांनी दिला; परंतु इतर पक्षाच्या नेत्यांवर परिवारवाद आणि घराणेशाहीची टीका करणाऱ्या मोदी यांना स्वपक्षातील परिवारवाद दिसत नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
संपादकीय 
Read More...

अर्थव्यवस्थेची झेप; पण प्रश्न जैसे थे!

स्थित्यंतर / राही भिडे भारताच्या अर्थव्यवस्थेने चौथ्या स्थानी झेप घेतली असून आता भारताची नजर तिसऱ्या स्थानावर आहे. जर्मनीची सध्याची आर्थिक स्थिती पाहताना भारत तिसऱ्या स्थानी नक्कीच झेप घेऊ शकतो; परंतु त्यापुढची वाट किती बिकट आहे. याकडे सरकारचे लक्ष दिसत नाही....
संपादकीय 
Read More...

पैशाच्या लोभासाठी क्रौर्याची परिसिमा!

कुटुंबीयांचा विरोध पत्कारून प्रेम विवाह करणाऱ्या आणि विवाह सोहळ्यात पतीची आणि त्याच्या कुटुंबाची 'बडदास्त' सांभाळत कोट्यवधी रुपयांची मुक्त उधळ दिल्यानंतरही असाह्य जाच सहन करत शेवटी जीवन संपवणाऱ्या 'वैष्णवी'च्या मृत्यूने राज्यभरात हुंडा बळीविरोधात संतापाची लाट पसरली आहे. आता खासदार सुप्रिया सुळे या प्रश्नावर पुरोगामी पुण्यात जनजागृती करणार आहेत. पती आणि सासरच्या जाचाला कंटाळून पुण्यात आतापर्यंत २०७ अशा 'वैष्णवींवर जीवन संपवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
संपादकीय 
Read More...

...संकटमोचक!

जागतिक आर्थिक स्थिती, अनेक देशांत युद्धजन्य स्थिती, भारत-पाकिस्तान तणाव, अमेरिकेच्या टॅरिफ वॉरचे ढग अशा प्रतिकूल परिस्थितीत रिझर्व्ह बँक सरकारच्या मदतीला धावून आली आहे. रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या विक्रमी लाभांशाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवरही चांगला परिणाम होईल. त्याचबरोबर अमेरिका, पाकिस्तानसारख्या राष्ट्रांचे मनसुबे उधळण्यास मदत झाली आहे
संपादकीय 
Read More...

मूर्खांचा बाजार

देशभक्ती असायलाही हवी. ती कृतीतून दाखवायलाही हवी; परंतु याचा अर्थ असा नव्हे, की देशभक्तीचे अवडंबर माजवावे. प्रसिद्धीसाठी देशभक्तीचा वापर करताना शब्दांचा, त्यांच्या प्रतिकाचा अर्थ समजून न घेता एखाद्या पाककृतीतून पाक हा शब्द वगळण्याचा वेडेपणा करावा. जयपूरमधील काही मिठाई दुकान चालकांनी म्हैसूर पाक या मिठाईच्या नावातील पाक हा शब्द काढून टाकून तिथे ‘श्री’ हा शब्द घुसडवण्याचा केलेला वेडेपणा आणि त्याला इतरांनी दिलेले देशभक्तीचे कोंदण हा निव्वळ वेडेपणा आहे.
संपादकीय 
Read More...