नवी दिल्ली: प्रतिनिधी
भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक दिल्ली येथील मुख्यमंत्री निवासाच्या कामातील कथित आर्थिक घोटाळ्याचे विशेष लेखापरीक्षण करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नायब राज्यपाल कार्यालयाने दिलेल्या अहवालानुसार ही कारवाई केली जात आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीतील पराभव दिसत असल्याने प्रकाश झालेल्या भारतीय जनता पक्षाकडून आकसने ही कारवाई केली जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
दिल्लीतील मुख्यमंत्री निवासाच्या नूतनीकरणात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप दीर्घ काळापासून केला जात आहे. नायब राज्यपालांच्या कार्यालयाने प्रथमदर्शनी हे आरोप सत्य असल्याचा अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठविला असून त्या अहवालाच्या आधारे या कामाची चौकशी केली जाणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
अर्थातच आम आदमी पक्षाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. दिल्लीच्या निवडणुकांमध्ये लागोपाठ झालेले पराभव आणि आगामी सार्वत्रिक निवडणुकीत हार नजरेसमोर दिसत असल्यामुळे हाताशी झालेल्या मोदी सरकारने हे पाऊल उचलण्याचा आरोप आपने केला आहे. आपल्या पक्षाची विश्वासार्हता वाढत असल्याचे सहज न झाल्यामुळेच केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोपही या पक्षाने केला आहे. केजरीवाल सरकारला बदनाम करण्याबरोबरच पडद्याआडून दिल्लीची सत्ता हस्तगत करण्याचा मोदी सरकारचा हा प्रयत्न असल्याची टीका ही पक्षाने केली आहे.
दरम्यान, दिल्लीत काँग्रेसचे सरकार सत्तेवर असताना वारंवार कॅग चौकशीची मागणी करणाऱ्या आम आदमी पक्षाला आणि मुख्यमंत्री केजरीवाल यांना आता या चौकशीची धास्ती का वाटते, असा सवाल दिल्ली प्रदेश भाजपने केला आहे. या चौकशीनंतर दूध का दूध, पानी का पानी होऊन जाईल असा विश्वासही पक्षाने व्यक्त केला आहे.