उपमुख्यमंत्री पवार यांचा "माळेगाव" कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल!

उपमुख्यमंत्री पवार यांचा

बारामती, प्रतिनिधी 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी ब वर्ग संस्था प्रतिनिधी मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पवार यांच्या या उमेदवारी अर्जाने सर्वत्र खळबळ उडाली आहे 

 माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्तात्रय येळे यांनी तहसील कार्यालयात दाखल केला. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात माळेगाव कारखान्याची निवडणूक आपण पूर्ण ताकतीने लढवणार असल्याचे सांगत मी स्वतः निवडणुकीत उतरणार असल्याचे सुतवाच केले होते, त्याचबरोबर माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदाचा उमेदवार प्रचाराच्या शुभारंभ वेळी घोषित करणार असल्याचे जाहीर केले होते. पवार यांच्या या वक्तव्यामुळे अध्यक्षपदाचा उमेदवार कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच अचानक उपमुख्यमंत्री पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्र राव तावरे व रंजनकमार तावरे हे दोन नेते नेहमीप्रमाणे एकत्र येऊन उपमुख्यमंत्री पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. माळेगावची निवडणूक अजित पवार यांच्यासाठी आव्हानाची ठरणार आहे. त्यातच स्वतः उमेदवारी दाखल करून पवार कोणती राजकीय खेळी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

000

हे पण वाचा  महिला मृत्यू प्रकरणी पालिके विरोधात मनसे आक्रमक!

About The Author

Advertisement

Latest News

दुय्यम निबंधक कार्यालयाच्या स्थलांतराबाबत उपोषणामुळे बसलेल्या कार्यकर्त्यांची तब्येत खालावली! दुय्यम निबंधक कार्यालयाच्या स्थलांतराबाबत उपोषणामुळे बसलेल्या कार्यकर्त्यांची तब्येत खालावली!
नारायणगाव   नारायणगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरित होऊ नये तसेच ते वारूळवाडी गावच्या हद्दीतच राहावे यासाठी वारूळवाडी येथे उपोषण सुरू...
पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात घ्यावा ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मातंग समाजाच्या मागण्यांवर लवकरच निर्णय - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पैशाच्या लोभासाठी क्रौर्याची परिसिमा!
सन्मानजनक मानधनासाठी ज्युनिअर आर्टिस्ट आक्रमक
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना अमेरिकन न्यायालयाने लावला चाप
दुष्काळग्रस्त गरजू विद्यार्थ्यांची यादी सरकारने मागवली

Advt