'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर काढणार चित्रपट'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर काढणार चित्रपट'

मुंबई: प्रतिनिधी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी आणि त्यांना ती प्रेरणा देत राहावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त व्यावसायिक चित्रपट काढणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्यावरील 'लोकमाता अहिल्यादेवी होळकर- ॲन इटर्नल फ्लेम' या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी आणि फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मंत्री मंगलप्रभात लोढा, माझी न्यायमूर्ती मृदुला भाटकर, कवी प्रसून जोशी आणि अहिल्यादेवी यांच्यावरील पुस्तकाचे लेखन आणि संपादन करणारे  पत्रकार आणि साहित्यिक अंबरीश मिश्र उपस्थित होते. 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या कार्याचा गौरव केला. आपल्या सैन्यात महिलांची स्वतंत्र तुकडी स्थापन करणाऱ्या अहिल्यादेवी या पहिल्या शासक होत्या. विविध प्रकारच्या कारागिरांना त्यांनी राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून दिली. त्याचप्रमाणे त्यांनी रामेश्वरपासून पेशावरपर्यंत आणि प्रयागराजपासून कराचीपर्यंत विविध तीर्थस्थळांवर घाटांची उभारणी केली. कावड यात्रेची परंपरा देखील त्यांच्यामुळे सुरू झाली, असे फडणवीस यांनी सांगितले. 

हे पण वाचा  Baramati Heavy Rains | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी!

'लोकमाता अहिल्यादेवी होळकर- ॲन इटर्नल फ्लेम' या पुस्तकाच्या प्रती सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सर्व मंत्र्यांना, राज्यातील सर्व क्षेत्रातील नामवंतांना पाठविण्यात येणार आहे,असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

विसरणार नाही ७२ तासांचे मुख्यमंत्रीपद 

या कार्यक्रमात फडणवीस यांचा परिचय करून देताना ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्याचा उल्लेख करण्यात आला. मात्र, फडणवीस यांनी आपल्या भाषणात सुरुवातीलाच ही चूक सुधारली. राज्याच्या राजकारणात बहुचर्चित ठरलेल्या 'पहाटेच्या शपथविधी'चा उल्लेख करून ते म्हणाले की, माझे ते ७२ तासांचे मुख्यमंत्रीपद तुम्ही विसरला असलात तरी मी ते कधीच विसरणार नाही. 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

Advt