श्री भागडेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मनोहर शेळके व उपाध्यक्षपदी संजना आगळे यांची बिनविरोध निवड 

श्री भागडेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मनोहर शेळके व उपाध्यक्षपदी संजना आगळे यांची बिनविरोध निवड 
वळती, सुनिल भोर
 
वळती (ता. आंबेगाव) येथील श्री भागडेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गुरुवारी ( दि.१२ ) मनोहर बबन शेळके व उपाध्यक्षपदी संजना पाराजी आगळे यांची बिनविरोध निवड झाली . यावेळी  निवडणूक निर्णय अधिकारी शांताराम शेटे यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली .
         
श्री भागडेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी सभासदांच्या विचारविनिमयाने संस्थेच्या प्रगतीचा चढता आलेख पहाता गावातील सर्वपक्षीय मतभेद बाजुला ठेवुन २९ मे या दिवशी सर्व सदस्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी यांनी जाहिर  केले . श्री भागडेश्वर नागरी पतसंस्थेच्या ठेवी - २६ .५०  कोटी  असुन  कर्ज वाटप १९ .१५ कोटी आहेत . संस्थेचे बिनविरोध निवड झालेले सदस्य पुढीलप्रमाणे , मनोहर बबन शेळके , गणपत दगडु भापकर , बाबाजी सिताराम लोखंडे , शांताराम पोपट भोर , भगवान गंगाराम लोखंडे , रामदास राजाराम लोखंडे , जालींदर लहु शेवाळे , रत्ना पंढरीनाथ भोर , संजना पाराजी आगळे  महादेव देवराम भोर , केरभाऊ  सिताराम दळे असे अकरा सदस्य बिनविरोध देण्यात आले . गुरुवार (दि १२ ) या दिवशी मंचर येथील यशवंतराव चवहण सभागृह ( पीडीसीसी बँक , मंचर ) येथे अध्यक्षपदासाठी मनोहर बबन शेळके व उपाध्यक्षपदासाठी संजना पाराजी आगळे यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार शरद सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक शिवाजीराव लोंढे व सुर्यवंशी साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी सहाय्यक निबंधक  , निवडणुक निर्णय अधिकारी शांताराम शेटे , मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब गाढवे व ग्रामस्थ उपस्थित होते .
 
000
Tags:

About The Author

Advertisement

Latest News

म्हसवे जिल्हा परिषद गटात सबकुछ 'मानकुमरे' म्हसवे जिल्हा परिषद गटात सबकुछ 'मानकुमरे'
स्वतः लढण्याच्या तयारीत असणाऱ्या नेत्यांची पत्नीच्या उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी  मेढा दत्तात्रय पवार : म्हसवे जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे...
रायसोनी कॉलेजच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागालाएनबीए मान्यता!
शास्त्रीय संगीत-नृत्य, गायनाने सजला 'गंगाधर स्वरोत्सव युव-रंग'
३० जूनपर्यंत मालमत्ता कर भरून सवलतींचा लाभ घेण्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन
योगाच्या सामर्थ्याने जागतिक आरोग्य आणि शांततेच्या दिशेने भारताचे नेतृत्व : केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव
रसिकांनी अनुभवले परिपक्व ध्रुपदगायन आणि रंगतदार ख्यालगायन
देशाच्या आर्थिक प्रगतीत सनदी लेखापालांचे महत्व अनन्यसाधारण: गायकवाड

Advt