निलेश चव्हाण याला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी

वैष्णवी आत्महत्या प्रकरणाशी संबंधित गुन्ह्यातील आरोपी

निलेश चव्हाण याला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी

पुणे: प्रतिनिधी

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाशी संबंधित गुन्ह्यातील आरोपी व वैष्णवीची नणंद करिष्मा हगवणे हिचा मित्र निलेश चव्हाण याला न्यायालयाने तीन जून पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. नेपाळच्या सीमेवरून अटक करून आज त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. 

वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या नऊ महिन्याच्या बाळाची हेळसांड केल्याचा गुन्हा निलेशवर बावधन पोलीस ठाण्यात दाखल आहे. निलेश तब्बल दहा दिवस फरार होता. 

वैष्णवी आत्महत्या प्रकरणी संपूर्ण हगवणे कुटुंब गजाआड झाल्यानंतर आपल्यालाही अटक होईल, या भीतीने निलेश चव्हाण याने पुण्यातून पोबारा केला. तीन राज्यांच्या सीमा ओलांडून तो नेपाळला गेला. दिल्ली येथे मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून पिंपरी चिंचवड पोलिसांच्या विशेष पथकाने त्याचा माग काढला आणि नेपाळच्या सीमेवर त्याला अटक करण्यात आली. 

हे पण वाचा  आझम कॅम्पसमध्ये वृक्षारोपण उपक्रम उत्साहात 

आज पहाटे अडीचच्या सुमारास निलेश आला पुणे विमानतळावर आणण्यात आले. विशेष तपास पथकाने चार वाजण्याच्या सुमारास त्याला बावधन पोलिसांच्या ताब्यात दिले. थेरगाव येथे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. निलेश याला साडेदहा वाजता न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. 

About The Author

Advertisement

Latest News

ख्रिश्चन समाजाला योग्य राजकीय प्रतिनिधित्व द्या: पी विल्सन ख्रिश्चन समाजाला योग्य राजकीय प्रतिनिधित्व द्या: पी विल्सन
पुणे : प्रतिनिधी देशात ख्रिस्ती समाजावर दिवसागणिक अत्याचार वाढत आहेत. संविधानिक हक्काचा भंग काही जातीवादी शक्ती करीत आहेत. मणिपूरचा प्रसंग,...
नागालँडमधील सात आमदारांनी सोडली अजितदादांची साथ
रॅगिंग प्रकरणी तीन विद्यार्थी डॉक्टरांचे निलंबन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी
'हिंदी बनली मुंबईची बोलीभाषा, तीच आमची लाडकी बहीण'
'फडणवीसांकडून बौद्धिक दिवाळखोरी व विकृतीचेच प्रदर्शन'
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष मुंबई युवक अध्यक्षपदी संतोष कदम!

Advt