वळती येथील श्री भागडेश्वर पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मनोहर शेळके व उपाध्यक्षपदी संजना आगळे यांची निवड.

वळती येथील श्री भागडेश्वर पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मनोहर शेळके व उपाध्यक्षपदी संजना आगळे यांची निवड.

मंचर, प्रतिनिधी 

वळती (ता. आंबेगाव) येथील श्री भागडेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मनोहर बबन शेळके व उपाध्यक्षपदी संजना पाराजी आगळे यांची बिनविरोध निवड झाली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी शांताराम शेटे यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली.

श्री भागडेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी सभासदांच्या विचारविनिमयाने संस्थेच्या प्रगतीचा चढता आलेख पहाता गावातील सर्वपक्षीय मतभेद बाजुला ठेवुन सदस्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी शांताराम शेटे यांनी जाहीर केले. बिनविरोध निवड झालेले सदस्य पुढीलप्रमाणे मनोहर शेळके, गणपत भापकर, बाबाजी लोखंडे, शांताराम भोर, भगवान लोखंडे, रामदास लोखंडे,जालींदर शेवाळे, रत्ना भोर, संजना आगळे,महादेव भोर, केरभाऊ दळे असे अकरा सदस्य बिनविरोध देण्यात आले.मंचर येथील यशवंतराव चव्हाण सभागृह मंचर येथे अध्यक्षपदासाठी मनोहर शेळके व उपाध्यक्षपदासाठी संजना आगळे यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार शरद सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव लोंढे व सहाय्यक निबंधक विठ्ठल सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी निवडणुक निर्णय अधिकारी शांताराम शेटे , मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब गाढवे व ग्रामस्थ उपस्थित होते.

000

हे पण वाचा  महाराणी ताराबाई, छ. शाहू महाराज समाधीसह किल्ले अजिंक्यताराचे होणार संवर्धन - ना. शिवेंद्रसिंहराजे

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

Advt