मुसांडवाडी फाटा ते म्हासुर्णे रस्ता गेलाय पूर्ण पणे खड्ड्यात
सन २००९ मध्ये मुख्यमंत्री सडक योजनेतील रस्ता
या रस्त्यावर बिन खड्ड्याचा दोन फूट ही चांगला रस्ता नाही
आजपर्यंत साधी रस्त्याची दुरुस्ती सुद्धा झाली नाही
कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी लक्ष देण्याची गरज.
वडूज, डॉ विनोद खाडे : खटाव तालुक्यातील दक्षिणेकडील शेवटचं टोक असलेल्या मुसांडवाडी फाटा ते म्हासूर्णे येतगांव हा सुमारे १३ किलोमीटरचा रस्ता सन २००९ मध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुन करण्यात आला होता. वडूजहुन उंबर्डे, गुरसाळे, शिरसवडी होळीचा गाव मार्गे हा रस्ता म्हसुर्णे येतगांव ला जातो. सांगली जिल्ह्यात जाण्यासाठी हा मोठा शॉर्टकट रस्ता आहे. त्याच बरोबर पंच क्रोशी तील शेणवडी, भूषणगड, चोराडे, रहाटनी, वांझोळी म्हसुर्णे या गावातील लोकांना शासकीय कामासाठी वडूजला यावं लागतं. या रस्त्यावर एसटी चालक ही वैतागून गेले आहेत. वडूज ला शिक्षण घेण्यासाठी पंच क्रोशीतील शेकडो विद्यार्थी रोज ये जा करत आहेत.वैद्यकीय उपचारासाठी जेष्ठ नागरिक, ग्रामस्थ येत असतात. दुचाकी, चार चाकी वाले बहुतांश या रस्त्याने शॉर्ट कट असल्यामुळे जात असतात. वडूज हुन निमसोड ला जाणारा रस्ता राजकीय हस्तक्षेपातून शिरसवडी वरून थेट वळवण्यात आला. तो रस्ता होळीचा गाव मार्गे जाणं अपेक्षित होतं. आता जवळ पास १६ वर्षे झाली या रस्त्यावर एक दीड फुटाचे हजारोच्या संख्येने पडलेले मोठमोठं खड्डे वेळच्या वेळी मुजवण्याची तसदी एकदा सुद्धा संबंधित बांधकाम विभागानं नं घेणं मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माण मतदार संघातील अनेक रस्त्यांची कामं वेगाने मार्गी लावली आहेत. सदर रस्ता हा कराड उत्तर मतदार संघात येत असल्यामुळे पहिल्यांदा आमदार मनोज दादा घोरपडे यांनी संबंधित विभागाचे अधिकारी सोबत घेऊन एकदा या रस्त्याने प्रवास करावा. आणि जया भाऊ तर संपूर्ण राज्याचे मंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी ही या रस्त्याने प्रवास करावा अशी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची इच्छा आहे. मागील १६ वर्षात काही मंत्री, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आजी माजी सरपंच, लहान मोठे नेते, संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी या रस्त्याने प्रवास केलाय.पण एकाला ही हा रस्ता करावा असं वाटलं नाही, हे मोठं आश्चर्य आहे. पावसाळा असल्यामुळे तर अधिक मोठे खड्डे झाले आहेत.सदर रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची संताप जनक मागणी नागरिक व एसटी, प्रवाशी, कर्मचारी देखील करत आहेत.
00000000000000000000000