हातवळण च्या शुभम गोगावले यांचे पोल्ट्री शेड अवकाळी पावसात जमीनदोस्त
तब्बल १८ हजार कोंबड्या दगावल्या; लाखोंचे नुकसान
पाटस : दौंड तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा तडाखा शेतकरी छोटे मोठे व्यवसायिक यांना बसू लागला आहे. तालुक्यातील हातवळण येथील युवा शेतकरी शुभम गोगवले यांनी कर्ज काढून शेतीला जोड असा लघुउद्योग म्हणून पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. ह्या पोल्ट्रीमध्ये विविध जातींच्या कोंबड्यांचे पक्ष्यांचे पालन पोषण केले. एक वर्षांपूर्वी सुरू केलेला हा व्यवसाय कसाबसा सावरला होता. मात्र सोमवारी (दि २६) सायंकाळी चार वाजण्याच्या आसपास अवकाळी पावसाने क्षणातच युवा व्यवसाय शुभमचे स्वप्न संपवले. या अवकाळी वादळी पावसात पोल्ट्री चे शेड जमीन दोस्त झाले. हे शेड कोंबड्यांच्या अंगावर पडल्याने तब्बल १८ हजार कोंबड्या दगावल्या असुन कोट्यावधी रुपयांचा आर्थिक नुकसान ही झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे शासनाने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शुभम गोगावले यांनी केली आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे वरवंड चे मंडल अधिकारी नितीन मक्तेदार , गाव कामगार तलाठी नीलम बोकडे , ग्राम विकास अधिकारी प्रज्ञा चव्हाण, सरपंच रमेश जगताप, पशुसंवर्धन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर खताळ आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदर नुकसानग्रस्त घटनेचा पंचनामा केला आहे.
000