बेल एअरची जिल्ह्यासाठी प्रामाणिक व समर्पित रुग्णसेवा - पाटील
वाई : जगाचा वेग वाढला आहे. रस्ते अपघात,अन्य आपत्कालीन परिस्थितीत, रक्तघटक व रक्ताची गरज भागवू शकणारे, समर्पित बेल एअर ब्लड सेंटर जिल्ह्यासाठी प्रामाणिक व समर्पित सेवा आहे, असे गौरवोद्गार मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी काढले.
इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या वाई हॉस्पिटलमध्ये ब्लड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी पाटील बोलत होते.
जागतिक रक्तदाता दिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमास प्रवीण भिलारे, माजी उपसभापती विक्रांत डोंगरे, ॲड. रोहित ढेबे, रुपेश बगाडे, मेहुल पुरोहित यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.पाटील पुढे म्हणाले, सर्पदंश, प्रसूती आणि अन्य अतितातडीच्या आजारात हॉस्पिटलमहाबळेश्वरच्या कांदाटी,सोळशी, कोयना या दुर्गम खोऱ्यांत उत्तम दर्जाची रुग्णसेवा देत आहे. आरोग्य, शिक्षण क्षेत्रात रेडक्रॉस सोसायटीच्या या संस्थेचे काम गेली अनेक वर्षे उत्तमतेने सुरू आहे..
कष्टकऱ्यांना आरोग्य सुविधा पुरविताना बेल एअर देत असलेल्या सेवांची साथ मोलाची, महत्त्वाची आहे, असे राजेंद्र राजपुरे म्हणाले.
संचालक फादर टॉमी स्कॅरिया यांनी चेलाराम फाउंडेशनच्या माध्यमातून वाई येथे १०० खाटांसह मेडिकल कॉलेज मंजूर झाल्याचे, तसा करार झाल्याचे सांगितले. रक्तदानासाठी जनजागृती वाढवायची आहे. आरोग्य सेवाकार्य करण्याची संधी मिळणे महत्त्वाचे आहे.या हॉस्पिटलमधून गरजूं, गरिबांना मोफत उपचार मिळतील, असेही फादर टॉमी प्रास्ताविकात म्हणाले.
कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट डॉ.अभिजीत फलके यांनी स्वागत केले. संदीप बाबर यांनी सूत्रसंचालन, आभार मानले.
00000000000000000000000000