आंधळीतील घरफोडीप्रकरणी चोरटा जेरबंद

आंधळीतील घरफोडीप्रकरणी चोरटा जेरबंद

दहिवडी पोलिसांची कामगिरी; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड हस्तगत

दहिवडी : आंधळी ता. माण येथिल बंद असलेल्या घरांचे कुलूप तोडून ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्यास जेरबंद करण्याची कामगिरी दहिवडी पोलिसांनी केली, रामचंद्र भुजाब शेंडे या संशयित आरोपीचे नाव असून त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल शंभर टक्के हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आंधळी (ता. माण) गावातील शेंडेमळा येथे राहणाऱ्या कमल तानाजी शेंडे यांच्या घरातील पत्र्याच्या कनगीतील डब्यात ठेवलेले एक लाख ६८ हजार रुपये किमतीचे दागिने व सहा हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल चोरीस गेला होता. याबाबत कमल शेंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार दहिवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यकपोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, पोलिस उपनिरीक्षक चांदणी मोटे, स्वाती धोंगडे, गुलाब दोलताडे व नितीन धुमाळ, पोलिस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट,नीलेश कुदळे, महेंद्र खाडे व लक्ष्मण कुचेकर यांनी गुन्ह्यातील संशयित आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून रामचंद्र भुजाब शेंडे (वय ५४, रा. शेंडेमळा, आंधळी, ता. माण) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे करीत आहेत.

0000000000000

हे पण वाचा  सुभीत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे जेईई आणि नीट परीक्षेत सुयश

Tags:

Advertisement

Latest News

कास तलाव भरू लागला परिसरात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस कास तलाव भरू लागला परिसरात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस
  कास पठार : जागतिक वारसा स्थळ असलेले कास पठार कास बामनोली परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने
आदर्श माध्यमिक विद्यालय पेटेश्वर नगर मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची उत्साहात स्वागत
आंधळीतील घरफोडीप्रकरणी चोरटा जेरबंद
सुभीत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे जेईई आणि नीट परीक्षेत सुयश
कराड दक्षिणमधील ११ गावे सौर हायमास्ट दिव्यांनी उजळणार
महाराष्ट्र हायस्कूलमध्ये नवांगतांचे स्वागत व पाठ्यपुस्तकांचे वितरण
कृष्णा कारखान्याच्या मोफत घरपोच साखर वितरणास प्रारंभ

Advt