डिजीटल मिटर विरोधी लढ्याला यश, ग्राहकांच्या परवानगीशिवाय मिटर बसवणे ठरणार गुन्हा

डिजीटल मिटर विरोधी लढ्याला यश, ग्राहकांच्या परवानगीशिवाय मिटर बसवणे ठरणार गुन्हा

म्हसवड : म्हसवड पालिका हद्दीत विज वितरण कंपणीच्या ठेकेदाराकडुन अनेक ठिकाणी बसवण्यात आलेल्या डिजीटल मिटरला शहरातील राजकिय, सामाजिक संघटनांनी तीव्र विरोध करीत घेतलेल्या आंदोलनाच्या भुमिकेपुढे अखेर विज कंपनीच्या अधिकार्यांनी गुडगे ठेकत ग्राहकांची परवानगी नसल्यास डिजीटल मिटर न बसवण्याचे आदेश संबधित ठेकेदाराला दिले असल्याची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे यांनी दिली.

म्हसवड पालिका हद्दीत विज वितरण कंपनीच्या ठेकेदाराने मनमानी करीत जबरदस्तीने काही ठिकाणी डिजीटल मिटर बसवले आहेत, ज्या ग्राहकांना हे डिजीटल मिटर बसवले आहेत त्यांना अवाच्या सवा विजबील आल्याने शहरी भागातुन याला युवक क्रांती दलाचे राजकुमार डोंबे यांनी कडाडुन विरोध केल्याने विज कंपनी च्या संबधित ठेकेदाराने शहरी भागातील मिटर जोडणी थांबवुन आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला. ग्रामीण भागातील सामान्य जनता दिवसभर पोटापाण्यासाठी घराबाहेर रहात असल्याने ठेकेदार व त्याच्या कर्मचार्याने याचा चांगलाच फायदा उठवत ग्रामीण भागातील बहुतांशी घरामध्ये त्यांच्या परवानगी विना मिटर बसवण्याचा धडाका लावला होता, ही बाब येथील सामाजिक कार्यकर्ते व नासपचे जिल्हा अध्यक्ष इंजि. सुनील पोरे व राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी ग्रामीण जनतेशी याबाबत चर्चा केली असता संबधित ठेकेदाराने त्यांच्याशी कोणतीही चर्चा न करता कोणतीही पुर्व सुचना न देता जबरदस्तीने मिटर बसवले आहेत अशी माहिती समोर आल्याने या दोघांनीही वेगवेगळी निवेदने देत याबाबत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, या इशार्या नंतर खडबडुन जागे झालेल्या विज कंपनी च्या अधिकार्यांनी अपर तहसिलदार  व पोलीस स्टेशन शी संपर्क साधत यावर तोडगा काढण्याची विनंती केली असता संबधीत आंदेलनकर्ते, पोलीस अधिकारी व अपर तहसिलदार यांच्यामध्ये एक संयुक्त बैठक घेण्यात आली, यामध्ये डिजीटल मिटर ग्राहकांच्या परवानगी शिवाय बसवले जाणार नसल्याचे विज कंपनी च्या अधिकार्यांनी सांगत याबाबत आपण स्पष्ट आदेश संबधित ठेकेदाराला देवु असे आश्वासन देण्यात आले, तर नवीन विज जोडणीसाठी मात्र डिजीटल मिटर बसवले जातील असे ही संकेत देण्यात आल्याने सोनवणे यांनी आपले होणारे आंदोलन मागे घेतले.

दरम्यान यापुर्वी शहरी भागात व ग्रामीण भागातील अनेक घरांमध्ये जबरदस्तीने जे डिजीटल मिटर बसवले आहेत व ज्यांना ५ पट अधिक विजबील आले आहे अशा ग्राहकांचे काय असा प्रश्न संबधित विज ग्राहकांकडुन उपस्थित केला जात आहे.

 

हे पण वाचा  बारामतीतील अतिक्रमण विरोधी कारवाईचा पथविक्रेत्यांकडून निषेध 

0000000000000000000000000000000000

Tags:

Advertisement

Latest News

रायसोनी कॉलेजच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागालाएनबीए मान्यता! रायसोनी कॉलेजच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागालाएनबीए मान्यता!
पुणे: जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, पुण्यातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग (ई अँड टीसी) विभागाला राष्ट्रीय मान्यता...
शास्त्रीय संगीत-नृत्य, गायनाने सजला 'गंगाधर स्वरोत्सव युव-रंग'
३० जूनपर्यंत मालमत्ता कर भरून सवलतींचा लाभ घेण्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन
योगाच्या सामर्थ्याने जागतिक आरोग्य आणि शांततेच्या दिशेने भारताचे नेतृत्व : केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव
रसिकांनी अनुभवले परिपक्व ध्रुपदगायन आणि रंगतदार ख्यालगायन
देशाच्या आर्थिक प्रगतीत सनदी लेखापालांचे महत्व अनन्यसाधारण: गायकवाड
४५ प्रवासी तासगावला सुखरूप परतले!

Advt