जिल्हा परिषदेचे ६५ गट व १३० गणासाठी होणार निवडणूक

पूर्वीच्याच गट व गण रचनेनुसार होणार कार्यवाही
सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या ६५ गट आणि १३० गाणांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे निवडणूक पूर्वीच्याच गट व गण रचनेनुसार होणार असल्याचे स्पष्ट झाले असून यामध्ये ओबीसी आरक्षण निश्चित केले जाणार आहे त्यामुळे इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या असून राजकीय मोर्चे बांधणीला सुरुवात होणार आहे
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी प्रवर्गाला आरक्षण मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती मागील महिन्यात न्यायालयाने ओबीसींना आरक्षण देऊन चार महिन्यात निवडणुका घ्याव्यात असा आदेश दिलेला त्यानुसार राज्य शासनाच्या वतीने निवडणुका घेण्यासाठी हालचाली वाढल्या सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होणार आहे यासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागाने आदेश काढून गट आणि गण रचनेविषयी सूचना केली आहे सातारा जिल्हा परिषदेतील ६५ गट व १३० गणाची निवडणूक होणार आहे यासाठी २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रभाग रचना विचारात घेऊन कार्यवाही केली जाणार आहे
गट आणि गण रचना पुढील प्रमाणे
वाई तालुका ४ गट ८ गण
महाबळेश्वर तालुका २ गट ४ गण
खंडाळा तालुका ३ गट ६ गण
फलटण ८ गट १६ गण
माण तालुका ५ गट १० गण
खटाव तालुका ७ गट 14 गण
कोरेगाव तालुका ६ गट व १२ गण
सातारा तालुका ८ गट 16 गण
जावली तालुका ३ गट ६ गण
पाटण तालुका ७ गट १४ गण
कराड तालुका १२ गट २४ गण
प्रभाग रचना कार्यक्रम पुढील प्रमाणे
१४ जुलै प्रभाग रचना अधिसूचना प्रसिद्धी
२१ जुलै जिल्हाधिकारांकडे हरकती व सूचना सादर करणे
२८ जुलै प्राप्त हरकतींच्या आधारे अभिप्रायासह विभागीय आयुक्त यांना प्रसाद सादर करणे
११ ऑगस्ट प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन निर्णय देणे
१८ ऑगस्ट अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवणे
About The Author
Related Posts
Latest News
