रोहित पवार यांची व्यक्तिगत जातमुचलक्यावर मुक्तता

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण

रोहित पवार यांची व्यक्तिगत जातमुचलक्यावर मुक्तता

मुंबई: प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्यात आर्थिक गैरव्यवहाराचा पुन्हा दाखल असलेल्या आमदार रोहित पवार यांना व्यक्तिगत जातमुचलक्यावर मुक्तता केली आहे.  पीएमएलए न्यायालयाने मुक्तता करून दिलासा दिला आहे. 

सक्तवसुली संचालनालयाने सन 2023 मध्ये रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो च्या विविध कार्यालये व आस्थापनांवर धाडी टाकून 50 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. रोहित पवार यांना सक्त वसुली संचालनालयाच्या कार्यालयात बोलावून त्यांची चौकशीही करण्यात आली होती. 

अनेक सहकारी साखर कारखाने अत्यल्प किमतीत आपल्या जवळच्या लोकांना विकल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अधिकारी व संचालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात रोहित पवार यांचा सहभाग असल्याचा आरोप सक्त वसुली संचालनालयाने ठेवला आहे. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्रात रोहित पवार यांना आरोपी करण्यात आले आहे.

हे पण वाचा  सिंहगडाच्या कड्यावरून खोल दरीत कोसळला तरुण

Tags:

About The Author

Related Posts

Advertisement

Latest News

Advt