- राज्य
- माझ्या नादी लागलं तर नांगराचा फाळ...
माझ्या नादी लागलं तर नांगराचा फाळ...
धमक्या देणाऱ्या गोरक्षकांवर बोलताना घसरली सदाभाऊंची जीभ
सांगोला: प्रतिनिधी
धमक्या देणाऱ्या गोरक्षकांन खडे बोल सुनावताना, माझ्या नादाला लागलात तर मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. नांगराचा फाळ तुमच्या..., असे बोलून आमदार व शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली. शेतकरी कधीही देशी गाय कसायाला देत नाही, हेही त्यांनी ठासून सांगितले.
विदेशी वाणाच्या भाकड गायी कत्तलखान्यात देण्यास गोरक्षकांकडून होत असलेल्या विरोधाचा निषेध करण्यासाठी खोत यांच्या नेतृत्वाखाली गोपालक शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी खोत बोलत होते.
देशी वाणाच्या गाई शेतकरी कधीही कसायाला देत नाही. ही हजारो वर्षांची परंपरा आहे. मात्र, तथाकथित गोरक्षक जर्सी आणि पोस्टन भाकड गाई कत्तलखान्यात नेणारी वाहने अडवून खंडणीखोरी करत असल्याचा आरोप सदाभाऊंनी केला.
तथाकथित गोरक्षकांच्या मुजोरीविरोधात मी शेतकऱ्यांची बाजू घेतली तर त्यांनी मला धमक्या देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, कोणाच्याही धमक्यांना भीक घाण मी शेतकऱ्यांची बाजू घेऊन लढणे सोडणार नाही, असा इशाराही सदाभाऊ खोत यांनी दिला.