पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोरेगावात आरोग्य विभागातर्फे हिवताप आणि डेंग्यूबाबत जनजागृती

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोरेगावात आरोग्य विभागातर्फे हिवताप आणि डेंग्यूबाबत जनजागृती

शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथून काढली प्रभात फेरी

कोरेगाव : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव तालुक्यात हिवताप, डेंग्यूसह साथीचे रोग पसरू नये यासाठी आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर आला आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथून नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने प्रभात फेरी काढण्यात आली.

जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलीफे, अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी श्रीमंत माळवे, तालुका आरोग्य अधिकारी आसिफ जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आणि तडवळे संमत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने हिवताप प्रतिरोध महिन्याचे औचित्य साधून वैद्यकीय अधिकारी डॉ. शंकर गांधीरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

आरोग्य विस्तार अधिकारी विठ्ठल गुजर, आरोग्य सहाय्यक कदम, गावडे आणि जंगम यांच्या नेतृत्वाखाली शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथून नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी प्रभात फेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, गटप्रवर्तक व आशा सेविका सहभागी झाल्या होत्या.

हे पण वाचा  कराड दक्षिणमधील ११ गावे सौर हायमास्ट दिव्यांनी उजळणार

0000000000000

Tags:

Advertisement

Latest News

मावळ तालुक्यातील कुंडमळा दुर्घटनास्थळाची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली पाहणी मावळ तालुक्यातील कुंडमळा दुर्घटनास्थळाची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली पाहणी
वडगाव मावळ/ प्रतिनिधी  मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील साकव पुल कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला, तर ५१...
सिडने पॉईंटवरील पालिकेचा सोलर ट्री कोसळला
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोरेगावात आरोग्य विभागातर्फे हिवताप आणि डेंग्यूबाबत जनजागृती
कोरेगावातील शिरढोण मागासवर्गीयांच्या शौचालयावर डल्ला..
धोम वाई खून खटला जलद गतीने चालवावा न्यायालयाचे निर्देश
जावली तालुक्यातील अवैध दारूविक्रीच्या विरोधात लवकरच आंदोलनं
सात्विक सावंत याचे नीट युजी परीक्षेत उज्जवल यश

Advt