पारगावच्या सेवारस्त्यावरील प्रश्न सोडवण्याचे आश्वासन

पारगावच्या सेवारस्त्यावरील प्रश्न सोडवण्याचे आश्वासन

खंडाळा : महामार्गावरील पारगाव येथे विविध मागण्यांसाठी रास्तारोकोची हाक देण्यात आली होती.दरम्यान,आंदोलनापूर्वी अधिकारी व नागरिक यांनी सेवा रस्त्यांवर ठिकठिकाणी पाहणी केली.यावेळी ड्रेनेज व्यवस्था सुरळीत करित अन्य कामे मार्गी लावू असे आश्वासन रस्ते प्राधिकरणाचे अधिकारी सुभाष घंटे यांनी दिले.

रस्त्याच्या अंडरपासमध्ये पावसाचे पाणी व व्यवसायिकांच्या ड्रेनेज पाण्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून पर्यायी व्यवस्था करावी यासह अन्य दहा मागण्यांकरित आशियाई महामार्गावरील पारगाव (ता.खंडाळा) येथे सोमवारी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. यावेळी आंदोलक जमा होत असताना, रस्ते प्राधिकरणाचे अधिकारी हि दाखल झाले.

यावेळी पारगावमधील महादेवनगर येथील गायत्री फायबर दुकाना शेजारी अंडरपास व्हावा.भैरवनाथ मंदिर पारगाव शेजारील मांडच्या पुलाखाली पावसाच्या पुराचे पाणी रस्त्यावर येत असल्याने वाहतुकीला अडथळा होतो.ड्रेनेजचे काम व्हावे.भैरवनाथ मंदिरनजीक पुला शेजारील सेवा रस्त्याचा तीव्र उतार कमी करण्यात यावा.पारगाव ते केसुर्डी एमआयडीसीपर्यंत सेवा रस्त्याला दिवाबत्तीची सोय व्हावी.उड्‌डाणपूल व सर्व अंडर पासमध्ये दिवाबत्तीची सोय करण्यात यावी.पिराचापुल व मांडच्या पूलाशेजारील अरुंद सेवा रस्त्यांच्या रुंदीकरणाचे अपूर्ण काम पूर्ण करावे. उड्डाणपूल, अंडरपास रस्त्यावर पाणी साचत असल्याने वाहतुकीला अडथळा होतो,त्यामुळे नवीन उड्डाण पुल व्हावा.आदी आंदोलनकर्त्यांच्या असणाऱ्या मागण्या जाणून घेत ठिक - ठिकाणी भेट देत पाहणी करण्यात आली.

सेवा रस्त्यांच्या पाहणी दरम्यान,मंगळवार पासुन पारगाव खंडाळा  बसस्थानकानजीक असणाऱ्या उड्डाण पुलासह पारगाव हाद्दीत ड्रेनेजच्या कामास प्राधान्य देत,अन्य असणारे प्रश्न मार्गी लावू असे श्री घंटे यांनी सांगितले.यावेळी खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक सुनिल शेळके यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

हे पण वाचा  बांधकाम मंत्र्यांच्या उपस्थितीत मेढा शाळेत होणार शाळा 'प्रवेशोत्सव'

0000000000000000000

Tags:

Advertisement

Latest News

मावळ तालुक्यातील कुंडमळा दुर्घटनास्थळाची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली पाहणी मावळ तालुक्यातील कुंडमळा दुर्घटनास्थळाची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली पाहणी
वडगाव मावळ/ प्रतिनिधी  मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील साकव पुल कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला, तर ५१...
सिडने पॉईंटवरील पालिकेचा सोलर ट्री कोसळला
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोरेगावात आरोग्य विभागातर्फे हिवताप आणि डेंग्यूबाबत जनजागृती
कोरेगावातील शिरढोण मागासवर्गीयांच्या शौचालयावर डल्ला..
धोम वाई खून खटला जलद गतीने चालवावा न्यायालयाचे निर्देश
जावली तालुक्यातील अवैध दारूविक्रीच्या विरोधात लवकरच आंदोलनं
सात्विक सावंत याचे नीट युजी परीक्षेत उज्जवल यश

Advt