दादासाहेब शिंगण यांना ‘राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार’ जाहीर

दादासाहेब शिंगण यांना ‘राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार’ जाहीर

साताऱ्यात 22 जूनला वितरण; संविधानिक व सामाजिक कार्यात पुढाकार घेणाऱ्यांचा होणार गौरव

 

कराड : मलकापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कराड तालुकाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब बाबू शिंगण यांना महालक्ष्मी आधार फाउंडेशनचा राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. साताऱ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

संविधानिक व सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कारवितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा रविवार (दि. २२) जून रोजी राजवाडा येथील पाठक हॉलमध्ये पार पडणार आहे. पुरस्कारप्राप्त कार्यकर्त्यांनी आपल्या उत्कृष्ट कार्यकर्तृत्वाच्या जोरावर समाजात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेत फाउंडेशनने त्यांना राष्ट्रीय स्तरावरील समाजभूषण पुरस्कारदेऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे पण वाचा  कास तलाव भरू लागला परिसरात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस

यामध्ये मलकापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कराड तालुकाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब शिंगण यांना फाउंडेशनचा राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आहे. श्री. शिंगण यांनी कराड व मलकापूर शहर परिसरासह संपूर्ण तालुक्यात आपल्या कार्यातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. समाजकार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या श्री. शिंगण यांच्या कार्याची दखल घेत फाउंडेशनने त्यांची पुरस्कारासाठी निवड केली असून साताऱ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या निमित्ताने पुरस्कारप्राप्त मान्यवरांसह त्यांच्या कुटुंबियांनाही उपस्थित राहण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. हा सोहळा त्यांच्या कार्यगौरवाचा एक महत्वपूर्ण क्षण ठरणार असून, त्यांच्या कार्याला एक नवा सन्मान मिळवून देणारा असेल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संस्थापिका व अध्यक्षा सौ. प्रतिभा शेलार असणार आहेत. याप्रसंगी अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

000000000000000

Tags:

Advertisement

Latest News

कास तलाव भरू लागला परिसरात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस कास तलाव भरू लागला परिसरात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस
  कास पठार : जागतिक वारसा स्थळ असलेले कास पठार कास बामनोली परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने
आदर्श माध्यमिक विद्यालय पेटेश्वर नगर मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची उत्साहात स्वागत
आंधळीतील घरफोडीप्रकरणी चोरटा जेरबंद
सुभीत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे जेईई आणि नीट परीक्षेत सुयश
कराड दक्षिणमधील ११ गावे सौर हायमास्ट दिव्यांनी उजळणार
महाराष्ट्र हायस्कूलमध्ये नवांगतांचे स्वागत व पाठ्यपुस्तकांचे वितरण
कृष्णा कारखान्याच्या मोफत घरपोच साखर वितरणास प्रारंभ

Advt