सात्विक सावंत याचे नीट युजी परीक्षेत उज्जवल यश
मसूर : राष्ट्रीय परीक्षा एजेंन्सी नीट युजी २०२५ चा निकाल नुकताच जाहिर झाला आहे. ही परीक्षा वैद्यकिय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी महत्वाची मानली जाते. देशभरात ही परीक्षा चार मे २५ ला घेण्यात आली होती. या परीक्षेस २२ लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते .
या परीक्षेत फडतरवाडी ता. फलटणचा सात्विक संजीवनी सुजित सावंत याने ऑल रँक ६४२४ आणि जनरल कॅटेगरी रँक ३०४९ मध्ये ९९.७० टक्के गुण घेऊन उज्वल यश संपादन केले.
सात्विक यास बेलवाडी ता. कराड गावचे त्याचे मामा मर्चंट नेव्ही इंजिनिअर शरद बोबडे, पिंपरी चिंचवड इंजिनिअरींग कॉलेजचे डीन सुदर्शन बोबडे, बँक अधिकारी जितेंद्र बोबडे, वडील डॉ. सुजित सावंत, आई दहिवडीच्या नायब तहसिलदार संजीवनी सावंत या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.
सात्विक याच्या या यशाबद्दल कराड व फलटणचे आजी - माजी आमदार, फडतरवाडी बिबी ता. फलटण, बेलवाडी ता. कराड येथील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.
00000000000000