ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल रिपाइंची 'भारत जिंदाबाद रॅली'

भर पावसात, भारत माता की जयच्या घोषात कार्यकर्त्यांचा उत्साही सहभाग

 ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल रिपाइंची 'भारत जिंदाबाद रॅली'

पुणे : प्रतिनिधी

पहेलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून बदला घेतला. पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिल्याबद्दल भारतीय सैन्याचे अभिनंदन करण्यासाठी, त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी, देश सैन्यासोबत असल्याचे दाखवून देण्यासाठी  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने शनिवारी 'भारत जिंदाबाद रॅली' 5चे आयोजन करण्यात आले होते. 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सुनीता वाडेकर, संघमित्रा गायकवाड, मंगल रासगे व रिपब्लिकन पक्षांच्या महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून 'भारत जिंदाबाद रॅली' ला सुरुवात झाली. भारत माता की जय..,   पाकिस्तान मुर्दाबाद..,  भारतीय सैन्याचा विजय असो.., अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. रॅलीत सहभागी कार्यकर्त्यांनी फक्त तिरंगी झेंडे हातात घेतलेले होते. 

रिपाइंचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, परशुराम वाडेकर, रोहिदास गायकवाड, असित गांगुर्डे, शैलेंद्र चव्हाण,अशोक कांबळे, अशोक शिरोळे, मोहन जगताप, महेंद्र कांबळे, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, बसवराज गायकवाड, वसंत बनसोडे, भगवान गायकवाड, वीरेन साठे, सुनिता वाडेकर, हिमाली कांबळे, संघमित्रा  गायकवाड, मंगल रासगे, सुन्नाबी शेख, संदीप धाडोरे, महादेव दंदी, लियाकत शेख, विनोद टोपे, शामशुद्दीन शेख, अविनाश कदम, कपिल जगताप, फिरोज खान, हबीब सैय्यद, भारत भोसले, चांदणी गायकवाड, सविता शेलार, शाम गायकवाड, निलेश गायकवाड, आकाश बहुले, के. जी. पवळे,  हनुमंत गायकवाड, उद्धव चिलवंत, दादा वारभुवन, रमेश तेलवडे, अतुल भालेराव, शांतीनाथ चव्हाण, राजेश गाढे, वैभव पवार,  स्वप्नील जाधव,  रोहित कांबळे, अप्पा वाडेकर, रामभाऊ कर्वे,  दीपक इसावे,  गोविंद साठे, शशांक माने, सुशील मंडल, तानाजी तापकीरे,  विशाल ओव्हाल, अरविंद शिंदे, आनंद लवटे, आनंद कांबळे, विशाल ओव्हाल, गौतम कदम, संजय बनसोडे, विक्की वालके, फक्कडराव शेळके, नंदा निकाळजे, कलावती भंडारे, निर्मला कांबळे, शोभा गायकवाड, आरती देटे, नंदा गायकवाड, अनिता कांबळे, सुनिता गायकवाड, शांता कांबळे, भारताबाई कराळे, सूरज जाधव, रवी अवसरमल, अक्षय अवसरमल, बाळासाहेब शेलार, रावसाहेब झेंडे, अंकिता भालेराव, शिवाजी गायकवाड, निलेश आल्हाट, अक्षय गायकवाड, बाळासाहेब खंकाल यांच्यासह रिपाइं चे पदाधिकारी कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते. 

हे पण वाचा  पुण्यात विविध ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी

भर पावसात निघालेल्या या 'भारत जिंदाबाद रॅली' मध्ये कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. बंड गार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड व रिपब्लिकन पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यानंतर शहराध्यक्ष संजय सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रगीताने 'भारत जिंदाबाद रॅली' चा समारोप झाला.

About The Author

Advertisement

Latest News

आनंद गोयल यांची शिवसेना पुणे शहर संघटकपदी नियुक्ती आनंद गोयल यांची शिवसेना पुणे शहर संघटकपदी नियुक्ती
पुणे: प्रतिनिधी शिवसेनेने पुणे शहरातील संघटना अधिक बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि निष्ठावान...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलसचिव सुभाषचंद्र भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली  
ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल रिपाइंची 'भारत जिंदाबाद रॅली'
बोगस कॉल सेंटरवर पोलिसांची धडक कारवाई
भीमनगरवासीयांचा मंत्री पाटील यांच्या कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रा. डॉ. जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रदांजली 
भारतीय कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी शुभमन गिल

Advt