'विरोधी नेत्यांच्या वादाचा भाजपला फायदा'
रोहित पवारांनी टोचले ज्येष्ठांचे कान
On
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची ताकद फार उल्लेखनीय असल्याचे दिसून येत नाही. मात्र विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये असलेल्या वाद विवादांचा फायदा घेऊन भाजप पुढे जात असल्याचे ऐकवून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ज्येष्ठ नेत्यांचे कान टोचले आहेत.
मुंबई: प्रतिनिधी

सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील वादाची जोरदार चर्चा आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
ज्येष्ठ नेत्यांच्या कडे पाहूनच आम्ही राजकारण शिकत असतो. त्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये आदराची भावना असते. तरुण आमदारांनी नेते कार्यकर्त्यांसाठी ते आदर्श होत आहेत याची जाणीव ठेवून त्यांनी आपल्यातील वादाचा फायदा उठवण्यापासून भाजपला रोखले पाहिजे, असे पवार यांनी नमूद केले.
Comment List