...त्यांना देशांतर्गत हिंसाचार का थांबवता येत नाही?

संजय राऊत यांचा खोचक सवाल

...त्यांना देशांतर्गत हिंसाचार का थांबवता येत नाही?

मुंबई: प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला सुपरमॅन समजतात. रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्ध आपणच थांबवले असा त्यांचा समज आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्ध थांबवण्याची क्षमता असलेले मोदी देशांतर्गत मणिपूर आणि जम्मू कश्मीर मध्ये सुरू असलेला दहशतवाद आणि हिंसाचार का थांबवू शकत नाहीत, असाच सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. 

स्वतःला समजतात विष्णूचा अवतार 

मोदी स्वतःला विष्णूचा अवतार समजतात. प्रभू श्रीरामांचे बोट धरून मीच त्यांना अयोध्येच्या श्रीराम मंदिरात नेते, अशी त्यांची समजूत आहे. ते नसते तर राम मंदिराची उभारणी झालीच नसती, असा आव ते आणतात. आपण नैसर्गिक पद्धतीने जन्माला आलेलो नसत नाही तर परमेश्वराने आपल्याला निर्माण केले आहे, असा समज ते पसरवतात, अशी टीका राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली. 

हे पण वाचा  'औरंगजेब नव्हे तर शिवाजी महाराज आमचे आदर्श'

मुंबई आणि कोकणात शिवसेनेचा प्रभाव 

महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मुंबईत तब्बल 25 जागांची मागणी केली आहे का, याबाबत विचारणा केली असता राऊत यांनी ही वस्तुस्थिती नसल्याचे सांगितले. विधानसभेच्या जागा वाटपाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. सर्व घटक पक्ष एकत्रित चर्चा करून त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. विदर्भात काँग्रेसची ताकद आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस सशक्त आहे. त्याचप्रमाणे मुंबई आणि कोकणात शिवसेनेचा प्रभाव आहे. मुंबईत लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागा आम्ही जिंकत आलो आहोत. या सर्व बाबी लक्षात घेऊनच महाविकास आघाडीत जागावाटप केले जाईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले. 

 

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us