- व्यवसाय
- हॉटेल व्यावसायिक दत्तात्रय कुंडलिक यांना महाराष्ट्र उद्योग सन्मान पुरस्कार!
हॉटेल व्यावसायिक दत्तात्रय कुंडलिक यांना महाराष्ट्र उद्योग सन्मान पुरस्कार!
On
रांजणगाव गणपती, प्रतिनिधी
सरदवाडी,ता. शिरुर येथील हॉटेल व्यावसायिक दत्तात्रय लक्ष्मण कुंडलिक यांना नुकताच महाराष्ट्र उद्योग सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. पुणे येथे नुकतेच स्विफ्ट अन् लिफ्ट यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच उद्योगात गगनभरारी घेणाऱ्या यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
शिरूर तालुक्यात विजय हिंदू या नावाने कुंडलिक यांचे हॉटेल असून येथील भेळ ही सातासमुद्रापार गेली आहे.राज्यातील अनेक राजकीय नेते पुणे नगर महामार्गावर जात असताना नेहमी येथील भेळीचा आस्वाद घेतात.तर परदेशात ही भेळ मागणीनुसार पाठवली जात आहे. पिंपरी चिंचवड येथे प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारे यांच्या हस्ते दत्तात्रय कुंडलिक व निखील कुंडलिक यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून महाराष्ट्र उद्योग सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी मोठ्या संख्येने राज्यभरातून उद्योजक उपस्थित होते.
000
Tags:
About The Author
Latest News
12 Jul 2025 12:18:22
मुंबई: प्रतिनिधी
कोणाचे आणि काय ऐकले नाही म्हणून आपल्यावर सक्तवसुली संचालनालयाने कारवाई केली हे जगजाहीर आहे. किडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे...