'पुणे महापालिकेची सत्ता हस्तगत करा'

शरद पवार यांची आपल्या पक्षाच्या नेत्या कार्यकर्त्यांना सूचना

'पुणे महापालिकेची सत्ता हस्तगत करा'

पुणे: प्रतिनिधी 

महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे  आणि महापालिकेची सत्ता हस्तगत करावी, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आपल्या नेत्या कार्यकर्त्यांना दिली आहे. 

महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या बैठकीत पवार बोलत होते. 

नव्या उमेदीचे आणि नक्की निवडून येण्याची खात्री असलेले उमेदवार उभे करण्यास पक्षाचे प्राधान्य असणार आहे. स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आपल्या उमेदवाराचा निश्चितपणे विजय होईलच, अशा दृष्टीने योग्य नियोजन करा आणि महापालिकेची सत्ता ताब्यात घ्या, असेही पवार यांनी सांगितले. 

हे पण वाचा  '... ही तर मोदी, शहा, भाजपच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी'

काही पक्ष आपल्याला राज्य स्तरावर तर काही पक्ष राष्ट्रीय स्तरावर सहकार्य करीत असतात. महापालिका निवडणुकीत युती, आघाडी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. कोणता पक्ष आपल्या सोबत येईल आणि आपल्याला किती जागा देईल, यावर युतीबाबतचा निर्णय आपले प्रदेशाध्यक्ष व त्यांचे सहकारी घेतील, असे पवार यांनी स्पष्ट केले. 

About The Author

Advertisement

Latest News

Advt