- राज्य
- 'कुणबी प्रमाणपत्र न्यायालयात टिकणार का ही शंकाच'
'कुणबी प्रमाणपत्र न्यायालयात टिकणार का ही शंकाच'
खुद्द मंत्री नरहरी झिरवाळ यांनीच व्यक्त केला संशय
हिंगोली: प्रतिनिधी
हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा शासन निर्णय जारी केल्यानंतर मराठा बांधवांना दिली जाणारी कुणबी प्रमाणपत्र न्यायालयात टिकतील का, अशी शंका खुद्द मंत्री नरहरी झिरवाळ यांनीच व्यक्त केली आहे. त्यांच्या या विधानावर उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. हिंगोली येथे प्रमाणपत्र वाटप पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा संशय व्यक्त केला.
हैदराबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीला मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. त्याबद्दल बोलताना झिरवाळ यांनी, याबाबत संविधानात आणि हैदराबाद गॅझेटियरमध्ये काय नमूद केले आहे ते तपासावे लागेल. आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करणे स्वाभाविक आहे. मात्र, प्रत्येक समाजाने शांततापूर्ण आंदोलन करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.