- राज्य
- 'मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर उडवला रंग'
'मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर उडवला रंग'
तणावपूर्ण वातावरण, शिवसैनिक आक्रमक
मुंबई: प्रतिनिधी
शिवाजी पार्क परिसरातील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात समाजकंटकांनी रंग उडवला. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे आढळून आले. पुतळ्यावर व आजूबाजूला लाल रंग टाकलेला दिसून आला.
हा प्रकार उघड होताच शिवाजी पार्कमध्ये संतप्त शिवसैनिकांनी गर्दी केली. त्यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त केला. त्यांनी तातडीने पुतळ्याची साफसफाई करून पुतळ्यावरील रंग काढून टाकला.
ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शिवाजी पार्क येथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत.
कोणतेही संस्कार नसलेल्या, भेकड, समाजकंटकांकडून हे कृत्य करण्यात आले आहे. अशा गोष्टी निषेध करण्याच्या पलीकडच्या आहेत. पोलीस किंवा अन्य सरकारी यंत्रणा अशा दुष्कृतींना आळा घालण्यास अयशस्वी ठरत आहे. वारंवार सरकारचे अपयश दिसून येत आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी केली.