कॅल्शियमची कमतरता पूर्ण करणारा आयुर्वेदिक सिध्द कॅल्सी योग !

कॅल्शियमची कमतरता पूर्ण करणारा आयुर्वेदिक सिध्द कॅल्सी योग !

सर्व पोटविकारांवर प्रभावी ठरलेले धौती योग आणि मूळव्याधीवर परिणामकारक इलाज करणारी धौती योग क्रीमच्या यशानंतर धौती योगच्या उत्पादकांद्वारे आता कॅल्शियमची पूर्तता करणार्‍या आयुर्वेदिक टॅब्लेट्सची निर्मिती करण्यात आलेली आहे. सिध्द कॅल्सी योग हे नाव असलेल्या टॅब्लेट्समधून शरीरात नैसर्गिक लोह, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शिअमची कमतरता भरून काढता येणार आहे.

प्रत्येकाला कॅल्शिअमची गरज असतेच. पण काहीजणांच्या बाबतीत शरीरातील कॅल्शिअमची मात्रा झपाट्याने कमी होते. चरकाचार्यांनी म्हटल्या प्रमाणे अतिव्यायाम, अस्थींचा क्षोभ (दाह होणे), आघात होणे, पडणे, वातकर आहार विहार यामुळे अस्थींच्या (हाडांच्या) ठिकाणी भंग (फॅक्चर), हालचालींना त्रास होणे, थकवा अशी लक्षणे निर्माण होतात. शरीरामध्ये वात हाडांच्या आश्रयाने राहतो. त्यामुळे वात वाढल्यास अस्थींचे (हाडांचे) आजार निर्माण होतात. केस, दात, नखे हे हाडांपासून बनलेले आहे असा आयुर्वेदाचा सिध्दांत आहे. त्यामुळे केस गळणे, दात किडणे, दात पडणे, त्वचेला काळवटपणा येणे अशा सुध्दा व्याधी निर्माण होतात.

स्त्रिया, लहान मुले, वयस्कर व्यक्तींमध्ये विशेषतः हाडांना बळकटी येण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही सिध्द कॅल्सी योग टॅबलेट्स आणल्या आहेत. यामध्ये शंख भस्म, शौक्तिक भस्म, कपर्दक भस्म, अर्जून साल घन, बलामूल घन, अश्वगंधा घन यांचा नैसर्गिक कॅल्शियमचा स्त्रोत (पुरवठा) म्हणून वापर केला आहे. यासोबत आयुर्वेदातील सर्वश्रेष्ठ रसायन टॉनिक म्हणून आमलकी रसायन दिले आहे. आमलकी (आवळा) हे विटामिन सी चा उत्कृष्ट स्त्रोत आहे. यासोबत नैसर्गिक आयर्न मिळावे म्हणून सप्तामृत लोहचा वापर केला आहे.

स्त्रिया, मुले, पुरुष, कमजोर व्यक्ती, वृध्द व्यक्ती, स्पोर्ट्समन, हाडांचा भंग (फ्रॅक्चर),  (हाडे ठिसूळ होणे) अशा सर्वांना सिध्द कॅल्सी योग टॅबलेट्स हे आयुर्वेदिक औषध अस्थिपोषक म्हणून वापरता येईल. याचे दीर्घकाल सेवन करावे. आयुर्वेदाच्या तज्ञ वैद्यांनी या औषधाची निर्मिती केली आहे. तेव्हा ह्या सिध्द कॅल्सी योगचे सेवन नियमतिपणे करावे असे आवाहन धौती योगच्या उत्पादकांद्वारे करण्यात आले आहे. ह्या सिध्द कॅल्सी योग टॅब्लेट्स सर्व आयुर्वेदिक व औषधी दुकांनामध्ये उपलब्ध असून धौती योगच्या वेबसाईटवरून किंवा अ‍ॅमेझॉनवरूनही ऑनलाईन ऑर्डर करता येतात.

हे पण वाचा  ओला इलेक्ट्रिककडून फेब्रुवारीतील तात्पुरत्या नोंदणी बॅकलॉगवर स्पष्टीकरण, मार्च अखेरीस पूर्ण निराकरणाचा विश्वास!

000

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

नाट्य परिषद कोथरूड शाखेने उभारली सांस्कृतिक कलावंत गुढी नाट्य परिषद कोथरूड शाखेने उभारली सांस्कृतिक कलावंत गुढी
पुणे : प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे आज (दि. 20) मराठी नववर्षारंभ (गुढी पाडवा) आणि यशवंतराव चव्हाण...
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला नव्या संचातील 'तुझे आहे तुजपाशी'चा  रौप्यमहोत्सवी प्रयोग सादर
लष्करी अधिकाऱ्याकडून लष्करी अधिकाऱ्याचीच फसवणूक
ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख शिंदे गटात डेरेदाखल
खंडणी आणि खुनाबाबत प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा महत्त्वाचा जबाब
महाराष्ट्र बँक सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेकडून सामाजिक कृतज्ञता निधी समर्पण
'मालवणी पोलिसांचा अहवाल तत्कालीन सरकारच्या दबावाखाली?'

Advt