- राज्य
- 'रोम जळत आहे आणि निरो... '
'रोम जळत आहे आणि निरो... '
आमदार रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची अतिवृष्टीमुळे वाताहत झाली असताना आणि राज्यावर कर्जांचा बोजा वाढत असताना वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाची देखभाल डागडुजी करण्यासाठी ४० लाखाहून अधिक निधी खर्च करण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
आज संपूर्ण राज्यात अतिवृष्टीने शेतकरी उध्वस्त झालेला असताना, सरकारकडे पैसे नसल्याने शेतकऱ्यांना मदत, कर्जमाफी दिली जात नसताना, राज्यावरील कर्जाचा बोझा ९.५ लाख कोटींच्या वर गेला असताना मुख्यमंत्र्यांच्या शासकीय घरी म्हणजेच वर्षा निवासस्थानी double bed matress, सोफा यासाठी २०.४७ लाख रुपये तर किचन दुरुस्तीसाठी १९.५३ लाख असा एकूण ४० लाखाहून अधिक पैसा खर्च केला जात असेल तर यास जनतेच्या पैशाची उतमात म्हणावं की वाढलेली महागाई?
मुख्यमंत्री यांना कदाचित हे माहित नसेल, पण हे असंच चालू राहिलं तर ‘रोम जळत आहे आणि निरो बासरी वाजवत आहे’ असाच त्याचा अर्थ निघेल... मंत्र्यांच्या घरांच्या दुरुस्तीची कामं केली पाहिजेत पण केंव्हा आणि त्यासाठी किती खर्च करावा याचाही ताळमेळ असला पाहिजे ना..!
अशी पोस्ट रोहित पवार यांनी समाज माध्यमांवर प्रसिद्ध केली असून त्याबरोबरच वर्षा निवासस्थानावर केलेल्या खर्चाची बिले देखील जोडली आहेत.