- राज्य
- अर्चना कुटे यांच्याकडून अडीच कोटींचा मुद्देमाल हस्तगत
अर्चना कुटे यांच्याकडून अडीच कोटींचा मुद्देमाल हस्तगत
पुण्यातून सीआयडी पथकाने केली होती अटक
पुणे: प्रतिनिधी
ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालिका आणि कोट्यावधींच्या घोटाळ्यातील आरोपी अर्चना कुटे यांच्याकडून रोकड आणि दागिने या स्वरूपात दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल राज्य गुन्हे अन्वेषण पथकाने ताब्यात घेतला आहे.
कुटे यांना नुकतेच पाषाण परिसरातून अटक करण्यात आली होती. त्यांचे पती, सोसायटीचे अध्यक्ष सुरेश कुटे आणि अन्य आठ संचालकांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
सोसायटीच्या गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये बुडवल्याबद्दल कुटे दांपत्य आणि सोसायटीच्या संचालकांविरुद्ध राज्यभरात 95 गुन्हे दाखल आहेत. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या छत्रपती संभाजी नगर शाखेचे पोलीस या गुणांचा तपास करीत आहेत.
बीड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने व राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने सोसायटी आणि संचालकांच्या 207 मालमत्तांचा अहवाल तयार केला असून तो जप्तीच्या कारवाईसाठी दाखल करण्यात आला आहे.