सलमान, सिद्दिकी, लॉरेन्स, काळवीट आणि... ?
खुनामागचे रहस्य काय?
बॉलीवूड अभिनेता सलमान खान याने काळवीटाची शिकार केलसरळत गँगस्टर लॉरेन्स याचा बिश्नोई समाज काळविटाला देव मानतो. काळवीटाच्या हत्येबद्दल लॉरेन्सने अनेकदा सलमानला धमकावले. स्टार राजकारणी बाबा सिद्दिकी हे सलमानचे मित्र. शत्रूचा मित्र तो आपला शत्रू, म्हणून लॉरेन्सने सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या करविली, असा साधा सरळ तर्क सध्या मांडला जात आहे आणि अनेकांना तो पटतोही आहे. मात्र, शत्रूचा मित्र म्हणून हत्या केली, हे खरंतर पटण्यासारखे नाही. सिद्दिकी यांच्या खुणा मागे नक्कीच अनेक रहस्य दडलेली असणार!
बाबा सिद्दिकी यांना राजकारण किंवा आर्थिक सुबत्ता पिढीच्या मिळालेली नाही.. विद्यार्थी दशेपासून राजकारणात सक्रिय होऊन बाबा सिद्दिकी यांनी राजकीय प्रभाव आणि आर्थिक सुबत्ता या दोन्ही बाबी प्राप्त केल्या. वांद्रे पूर्वसारख्या मुंबईतील अत्यंत महत्त्वाच्या उपनगरावर दीर्घकाळ सिद्दिकी यांचे वर्चस्व राहिले. या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्यांनी दीर्घकाळ केले. आता त्यांचा मुलगा झिशान या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे. अतिशय प्राईम समजल्या जाणाऱ्या या परिसरातील जागांच्या आणि मालमत्तांच्या व्यवहारांवर देखील सिद्दिकी यांचे वर्चस्व होते. या परिसरात मालमत्तेचा एकही व्यवहार सिद्दिकी यांच्या परवानगीशिवाय करणे शक्य नव्हते.
याच मालमत्तांच्या व्यवहारावरील वर्चस्वावरून एकेकाळी आंतरराष्ट्रीय डॉन दाऊद इब्राहिम याचा उजवा हात असलेल्या छोटा शकील याच्याशी बाबा सिद्दिकी यांचे खटकेदोघांनाहीवांद्रे पूर्व येथील एक मोक्याचा भूखंड विकसित करण्याचा निर्णय बाबा सिद्दिकी यांनी घेतला. त्यात गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी एका व्यापाऱ्याला राजी केले. आर्थिक फायदा लक्षात घेऊन व्यापारी देखील गुंतवणूक करण्यास तयार झाला. मात्र, छोटा शकीलने या व्यवहाराला आक्षेप घेतला. गुंतवणूक करणारा व्यापारी देखील दाऊदशी संबंधित होता. छोटा शकीलने घेतलेल्या हरकतीमुळे त्याची मात्र कोंडी झाली. तो प्राथमिक गुंतवणूक करून बसला होता. बाबा सिद्दिकी यांच्याबरोबर करारमदार ही झाले होते. प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली होती. एकीकडे हा प्रकल्प न करण्यासाठी छोटा शकील धमकावत होता तर दुसरीकडे बाबा सिद्दिकी कायदेशीर करार मतदार दाखवून जेरीस आणत होतेघेतछोटा शकीलने आपला उजवा हात अहमद लंगडा याला पाठवून सिद्दिकी यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. मात्र सिद्दिकी यांनी त्याला भीक घातली नाही. अखेर खुद्द छोटा शकीलने सिद्दिकी यांना फोन वरून धमक्या दिल्या. त्यावर सिद्दिकी यांनी पोलिसांकडे तक्रार केली. सिद्दिकी यांच्या राजकीय प्रभावाने पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत अहमद लंगडा आणि संबंधित व्यापाऱ्याला अटक केली. या घटनेमुळे बाबा सिद्दिकी हे छोटा शकीलचे, पर्यायाने दाऊदचे क्रमांक एकचे शत्रू बनले.
अशाच प्रकारे जमिनीच्या व्यवहारातील वर्चस्वावरून बाबा सिद्दिकी यांनी स्वतःला अनेक शत्रू निर्माण केले होते. त्याचप्रमाणे बॉलीवूड मध्ये देखील बाबा सिद्धी कि यांचा मोठा दबदबा होता. बाबा सिद्दिकी हे वांद्रे पूर्वचे अनभिषक्त सम्राट! वांद्रे च्या एका बाजूला जुहू तर दुसऱ्या बाजूला वरळी. जुहू, वांद्रे, वरळी हा बॉलिवूडचा केंद्रबिंदू. सिद्दिकी यांची इफ्तार पार्टी हा केवळ जनसामान्यांसाठीच नव्हे तर नामांकित बॉलीवूड कलाकारांसाठी ही आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. सलमान आणि शाहरुख या बॉलीवूड मधील दोन टॉपच्या सुपर स्टार्स मध्ये वर्षानुवर्ष असलेला दुरावा बाबा सिद्दिकी यांच्या पुढाकाराने त्यांच्याच इफ्तार पार्टीत संपुष्टात आला होता.
गुन्हेगारी विश्व आणि बॉलीवूड
गुन्हेगारी विश्व आणि बॉलीवूड यांच्यातील नातं हे एक उघड गुपित आहे. मुंबईत संघटित गुन्हेगारी आणि सूत्रबद्ध तस्करीचा पाया घालणारा हाजी मस्तान याच्यापासून बॉलीवूड आणि गुन्हेगारी विश्व यांच्यात नातं धुळ्याल सुरुवात झाली. दिसण्यात एका अव्वल दर्जाच्या अभिनेत्री शी साम्य असलेली आणि बी ग्रेड सिनेमात काम करणारी एक अभिनेत्री हाजीमस्तानल आवडली. तो तिच्या प्रेमात पडला. चित्रपटसृष्टीत तिला प्रस्थापित करण्यासाठी तो चित्रपटांमध्ये पैसे गुंतवू लागला. या वेळेपासून बॉलिवूड आणि गुन्हेगार या दोघांनाही एकमेकांना साथ देण्यात असलेली सोय लक्षात आली. चित्रपट तयार करण्यासाठी पैसा लागतो. ती रक्कम थोडी थोड नसते. त्यामुळे गुंतवणूकदार ही बडा लागतो. गुन्हेगारांकडे अमाप पैसा असतो. मात्र, तो कागदावर दाखवायचा कसा असा प्रश्न निर्माण होतो. चित्रपट सृष्टी पैसा गुंतवला की तो पांढरा होतो. चित्रपट चालला किंवा नाही चालला तरी सैदा फायद्याचा होतो.
या आर्थिक सोयीमुळे बॉलीवूड आणि गुन्हेगारी विश्व यांच्यातील नाते घट्ट झाले. दाऊद इब्राहिमच्या काळात ते अधिकच वाढले. चित्रपट सृष्टीत जलद गतीने प्रस्थापित होण्याहोईलन्स तारे तारका गुन्हेगारांचे मित्र, प्रसंगी प्रेमिका ही बनल्या. दाऊद दुबईत असेपर्यंत बॉलीवूड आणि गुन्हेगारी विश्व हे नाते ऐन बहरात होते. अनेक तारे तारका दाऊदच्या पार्ट्यांमध्ये जाऊन नाचत. त्यामुळे पैसाही मिळायचा आणि भाईचा पाठिंबाही मिळायचा.
दाऊद पाकिस्तान आत आल्यावर त्याचा प्राधान्यक्रम बदलला. त्याने इतर अनेक व्यवसायांकडे, विशेषतः अमली पदार्थांच्या व्यापाराकडे लक्ष केंद्रित केले. नट नट्यांच्या सहवासापेक्षा पाक राजकारणी आणि लष्कर शहा यांचा सहवास त्याला अधिक सोयीचा वाटू लागला. पर्यायाने त्याचे बॉलीवूड कडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे अर्थातच बॉलीवूड आणि गुन्हेगारी विश्व यांच्यातील नात्यांमध्ये एक पोकळी निर्माण झाली. ती आजही कायम आहे. जाऊदे च्या पावलावर पाऊल टाकून चालण्याचा प्रयत्न करणारा लॉरेन्स कदाचित ही पोकळी भरून काढण्याच्या प्रयत्नात असावा. 'भय बिन होय ना प्रीत,' हे वास्तव गुन्हेगारांपेक्षा कोणाला अधिक चांगले ठाऊक असणार? सलमान हा सध्याच्या काळातील बॉलिवडचा सर्वात मोठा स्टार आहे. त्याला धमकावले, बॉलीवूडची जवळीक असलेल्या बाबा सिद्दिकी सारख्या कसलेल्या राजकारण्याला संपवले तर बॉलीवूडमध्ये आपला धबधबा निर्माण होईल, या जाणिवेनेच कदाचित लॉरेन्सने बाबा सिद्दिकी यांचा काट काढला असावा.
पोलिसांकडे तर या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आणखी वेगळे तर्क असावेत. सिद्दिकी यांची हत्या खरोखरच लॉरेन्सने घडवून आणली का, लॉरेन्सची या हप्तेला परवानगी होती का, की इतर कोणत्या कारणाने, इतर कोणत्या इसमाने सिद्धीकी यांची हत्या घडवून आणली, अशा शंका मुंबई पोलिसांना आहेत. वेगवेगळ्या शक्यता विचारात घेऊन मुंबई पोलिसांचा तपास सुरू आहे.
अज्ञात बंदूकधारी आणि बिश्नोई गॅंग
मागील काही काळापासून अनेक देशात विशेषतः पाकिस्तानात भारताचे शत्रू असलेल्यांची अज्ञात हल्लेखोरांकडून हत्या होत आहे. त्यामुळे हे अज्ञात बंदूकधारी हा जगभरात चर्चेचा विषय झाला आहे. भारताचे आंतरराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणा असलेल्या रिसर्च अँड अनलिसिस विंगने जगभरात हे अज्ञात बंदूकधारी पसरविले असल्याची चर्चा आहे. हे अज्ञात बंदूकधारी म्हणजे बिश्नोई गॅंगचे शार्प शूटर असल्याचा आरोप कॅनडाच्या पंतप्रधानांनी नुकताच केला आहे. हे महासाहेब भारतावर बेछूट आरोप करण्यास कधीच कचरत नाहीत. हे आरोप सिद्ध करण्यास त्यांना कधीही यश येत नाही. याबद्दल त्यांना जराही खंत नाही. त्यामुळे त्यांच्या आरोपाला गांभीर्याने घ्यावे असे काही नाही. कोणत्याही परिस्थितीत रॉ हा आरोप मान्य करणार नाही. त्याला तसा पुरावाही नाही. मात्र, देशोदेशीच्या गुप्तचर यंत्रणा काही कामे करून घेण्यासाठी गुन्हेगारी टोळ्यांचा वापर करून घेतात ही बाब उघड आहे. विशेषतः सध्याचे मुख्य राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल रॉचे प्रमुख असताना दाऊदचा पिच्छा पुरवण्यासाठी त्याचा एकेकाळचा उजवा हात आणि नंतर कट्टर वैरी झालेला छोटा राजन याचा रॉने पुरेपूर उपयोग करून घेतला. अनेक वेळा त्याला दाऊदच्या हल्लेखोरांपासून आणि देशोदेशीच्या पोलिसांपासून वाचण्यासाठी मदत केली. छोटा राजन याला करण्यात आलेली अटक आणि तुरुंगवास ही केवळ शिक्षा नव्हे तर त्याला देण्यात आलेली सुरक्षा होती. या पार्श्वभूमीवर जगभरातील ११ देशात कार्यरत असलेल्या बिश्नोई गॅंगचा वापर करून जगभरातील देशाच्या शत्रूंचा नायनाट करीत असेल तर त्यात गैर ते काय?
Comment List