'जागतिक शांततेसाठी भारत आणि चीनमध्ये सौहार्द आवश्यक'
नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात तब्बल पन्नास मिनिटे चर्चा
मॉस्को: वृत्तसंस्था
ब्रिक्स संमेलनाच्या निमित्ताने रशियात एकत्र आलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यामध्ये बंद दाराआड तब्बल पन्नास मिनिटे चर्चा झाली. भारत आणि चीन या दोन मोठ्या देशांमध्ये शांततेचे, सौहार्दाचे आणि सलोख्याचे संबंध असणे केवळ या दोन देशांसाठीच नव्हे तर जागतिक शांततेसाठी आवश्यक आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी या भेटीनंतर नमूद केले.
रशियाचे राष्ट्रप्रमुख व्लादिमीर पुतीन यांच्या पुढाकाराने मोदी आणि जिनपिंग यांच्यात चर्चा घडवून आली. तब्बल पाच वर्षानंतर दोन्ही राष्ट्रप्रमुखांची भेट झाली आहे. मागील काही वर्षात भारत आणि चीन यांच्यात तणावाचे वातावरण होते. काही काळापूर्वी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सैन्य मागे घेण्याची भूमिका घेऊन चीनने या चर्चेची पार्श्वभूमी तयार केली. याला भारताने जागतिक पातळीवर राजनैतिक भूमिकेतून चीनची केलेली कोंडी आणि पुतीन यांचा चीनवरील दबाव कारणीभूत ठरला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर उपलब्ध असलेल्या प्रत्येक व्यासपीठावर चीन आणि पाकिस्तान या शेजारी राष्ट्रांना खडे बोल सुनावले आहेत. पाकिस्तान कडून दहशतवाद्यांना केली जाणारी मदत आणि चीनचा विस्तार वाद, दक्षिण प्रशांत महासागर क्षेत्रात केली जाणारी दडपशाही याचा बुरखा भारत आणि वारंवार जगासमोर फाडला. त्यामुळे चीनच्या दडपशाहीला बळी पडणारे अन्य देशही भारताच्या आवाजात आवाज मिसळू लागले. अर्थातच जागतिक पातळीवर चीनची कोंडी करून त्याला एकाकी पाडण्यात भारतीय राजनीती यशस्वी ठरली. त्यामुळे चीनला दोन पावले मागे घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
मागील काही काळापासून व्यापार क्षेत्रात अमेरिका आणि चीन यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. त्याशिवाय प्रामुख्याने मागील वर्षभराच्या काळात चीन मोठ्या आर्थिक संकटाला तोंड देत आहे. चीनमध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण होत आहे. बांधकाम क्षेत्र मोठ्या प्रमाणावर ढासळले आहे. अशा परिस्थितीत भारत आणि अन्य देशांना दुखवून स्वतःवर आर्थिक संकट ओढवून घेणे चीनसाठी आपल्याच पायावर दगड पाडून घेण्यासारखे आहे. यामुळे देखील चीनला भारतासारख्या देशाबरोबर चर्चा करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
Comment List