वडगाव शेरी मतदार संघ विकासापासून दुर्लक्षित - डॉ. हुलगेश चालवादी
पुणे...२००९ ला वडगाव शेरी मतदार संघात मध्ये नवीन रचनेप्रमाणे निवडणुका झाल्या तेव्हापासून एकच समूहाचे तीन आमदार या ठिकाणी निवडून आले असून इतर समूहातील एकही उमेदवार आतापर्यंत निवडून आलेला नाहीत. इतर समूहातील लोकांची लोकसंख्या जास्त असून सुद्धा त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही जे कोणी या भागातून निवडून गेले त्यांनी सर्व नागरिकांसाठी कोणत्याही प्रकारचे काम केलेलं नसून मोठ्या भांडवलदारांसाठी ते काम करीत आहे म्हणून या भागाचा विकास झाला नाही असे शब्दात हुलगेश चालवादी यांनी मांडणी केली सरकारी शाळेची दुर्दशा , चांगल्या शिक्षणापासून विद्यार्थ्यांचा दुरावा , विविध महापालिकेच्या सुविधा पासून नागरिक वंचित, रोजगार नसल्यामुळे युवकांचे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी क्षेत्रात वाढ, वाहतूक व्यवस्था व रस्त्याचे नियोजन नसल्याने चुकीचे निर्माण झालेले रस्ते त्यामुळे वाहतूक खोळंबा , अंडरग्राउंड विद्युत उपकरणे नसल्याने अपघाताने मोठ्या प्रमाण मृत्यूचे प्रमाण वाढले , म्हाडांच्या घराच्या दुरावस्था व मोठ्या प्रमाणात विकासाकडे दुर्लक्ष , एस आर ए झोपडपट्टी पुनर्वसनाच्या कायद्यात मध्ये बदल करून नवीन जीआर काढण्याची मागणी , दगडांच्या खाणील भरलेल्या पाण्याचा योग्य वापर न झाल्यामुळे तो अपघाताचा पॉईंट ठरलेला आहे , लहान मुले रस्त्यावर भिक मागतात भिक्षेकर निवास असताना सुद्धा त्या मुलांकडे व त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष , खरेदी विक्री बंद केल्याने अनेकांना मनस्ताप तसेच घर जमीनी पासून अनेकांना अलिप्त ठेवले असून त्यामध्ये फसवेगिरी मध्ये वाढ झाल्याची दिसून येत असल्याचे चलवादी यांनी म्हटले. गुंठेवारी व भरमसाठ दंड आकारणी त्याचबरोबर टोलचे प्रश्न , पुराच्या पाण्याचे योग्य नियोजन नसणे , केंद्रशासन व मनपाच्या व शासनाच्या विविध योजनांचे योग्य रीतीने न राबविणे, झोपडपट्टी ठिकाणी अग्निशामन दलाचे नियोजन नाही, एमआयडीसी व रोजगार निर्माण करण्यामध्ये लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने अनेक युवक बेरोजगार झाले आहेत , ससूनच्या धरतीवर हॉस्पिटलचे नियोजन नसल्यामुळे अनेक नागरिकांना त्याचा मनस्ताप होत असून . सौर ऊर्जा प्रचार प्रसार व कृतीवर शासन निष्क्रिय ठरले आहे , त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे म्हणून यावेळी सर्व नागरिक मला जनतेची सेवा करण्याची संधी देईल असे बसपाचे प्रदेश महासचिव हुलगेश चलवादी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले .
बसपा सामाजिक मुद्द्यांबरोबर विकासाच्या मुद्द्यांवर निवडणुकाला सामोरे जाणार आहे. असेही ते म्हणाले
बसपा महाराष्ट्र मध्ये सर्वच्या सर्व 288 जागा लढणार असून सर्व जागा लढणारा बसपा एकमेव पक्ष ठरणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितलं
000
Comment List