- राज्य
- मंगल प्रभात लोढा यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
मंगल प्रभात लोढा यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
दादरचा कबूतरखाना पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती
मुंबई: प्रतिनिधी
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत दादर येथील ऐतिहासिक कबूतरखाना पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
कबुतरामुळे नागरिकांसाठी आरोग्य धोक्यात येत असल्याच्या तक्रारीवरून न्यायालयाच्या आदेशानुसार दादरच्या ऐतिहासिक कबूतरखाना आणि शहरातील अन्य ठिकाणचे कबूतरखाने बंद केले. मात्र, या निर्णयाच्या विरोधात जैन समाजाने रस्त्यावर उतरून आंदोलने केली. लोढा यांचा या आंदोलनांना पाठिंबा होता तर राज ठाकरे यांचा कबूतरखाने सुरू ठेवण्याच्या आग्रहाला विरोध होता.
शहरातील कबूतरखाने बंद झाले असताना मंगल प्रभात लोढा यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कबूतरखाना सुरू केला आहे. त्याचप्रमाणे विविध उपनगरांमध्ये 51 कबूतरखाने सुरू करण्याची घोषणा लोढा यांनी केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे पुन्हा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोढा यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी कबूतरखाना सुरू करण्याच्या शक्यतेवर चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.