दारूच्या नशेत एकाचा डोक्यात दगड घालून खून
On
कोल्हापूर – कोल्हापुरातील रेल्वे स्थानकासमोर कोरगावकर कंपाउंड इथ राहणाऱ्या एकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. सतीश महादेव पाटील(वय 48 रा. शाहूपुरी को.) असं त्याचं नाव असून घटनास्थळी शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान पोलिसांनी रोहन विजय गायकवाड याला ताब्यात घेतले आहे.
सतीश पाटील हा आपल्या कुटुंबियांसमवेत राहतो. काल रात्री कोरगावकर कंपाऊंड परिसरात मद्य प्राशन करण्यासाठी आलेल्या युवकांचा सतीश पाटील यांच्याशी वाद झाला. यावेळी त्या तरुणांनी दारूच्या नशेत सतीश पाटील यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना गंभीर जखमी केलं आणि तिथून पळ काढला. जखमीला उपचारासाठी शासकीय रुग्णालय दाखल केले मात्र त्यांचा मृत्यू झाला फरार आरोपींचा शोध शाहूपुरी पोलीस घेत आहे.
000
Tags:
Comment List