- अन्य
- दहावीच्या 1976 च्या बॅचचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न; तब्बल ४८ वर्षांनी भेटले शालेय सवंगडी!
दहावीच्या 1976 च्या बॅचचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न; तब्बल ४८ वर्षांनी भेटले शालेय सवंगडी!
On
महेश कांबळे, म्हसवड
म्हसवड येथील म्हसवड म्युनिसिपल हायस्कुल (सिद्धनाथ हायस्कुल) च्या एस. एस. सी. (दहावी) 1976 च्या ब्याच मधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा दि. 4 डिसेंबर 2024 रोजी उत्साहात पार पडला.
एकमेकांची आपुलकीने विचारपूस करत गेल्या 48 वर्षातील अनुभवांची, घटनांची चर्चा करत येथील म्हसवड म्युनिसिपल हायस्कूल च्या माजी विदयार्थी, विद्यार्थिनींनी स्नेह मेळाव्यात शाळेचे जुने दिवस पुन्हा अनुभवले. विविध क्षेत्रामधून सेवा निवृत्त झालेले, उद्योग/कृषि व्यवसायात असलेल्यानी या स्नेह मेळाव्यास हजेरी लावली होती. सासरी असलेल्या महिला विद्यार्थिनींनी कमालीचा सहभाग घेतला होता. कार्यक्रमास मार्गदर्शन करण्यासाठी तत्कालीन शिक्षक मा. जाधव सर (पुसेगांव), मा. वाघमोडे (गोंदवले) व सद्याचे प्राचार्य दासरे लाभले होते. एकमेकांची ओळख करून देताना माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या मेळाव्यास 55 माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. पैकी 17 महिला विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सिद्धार्थ सरतापे यांनी प्रास्ताविक केले. इन्नूस सय्यद यांनी सूत्र संचालन केले. राजेंद्र सोनवणे, निवृत्ती वीरकर, उमेश राऊत, अजित नामदे, चंद्रकांत महामुनी व मंगल नामदास यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रित्या सहकार्य केले.
आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस अनुभवला - सुनंदा जंबुरे सोलापुर, माजी विद्यार्थिनीआज तब्बल ४८ वर्षांनी दहावीच्या त्याच वर्गात, त्याच बाकावर, त्याच वर्ग मैत्रीणीसेबत बसल्यावर मी पुन्हा ४८ वर्ष मागे गेले, शाळेतील ते दिवस भरभर नजरेसमोर आरशाप्रमाणे उभे राहिले उतारवयात यामुळे नवा उत्साह अंगात संचारला. पु्न्हा एकदा विद्यार्थीदशेत आम्ही सर्वजण गेलो, त्यांच्यासोबत तशीच दंगामस्ती करीत संपूर्ण दिवस एकमेकांशी गप्पा मारल्याने खरोखरच हा दिवस अविस्मरणीय दिवस माझ्यासह सर्वांसाठी ठरला असल्याचे अनेकांनी सांगितले.
Tags:
About The Author
Related Posts
Latest News
15 Sep 2025 13:11:21
मुंबई: प्रतिनिधी
पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवरून कर्ज मिळू नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या केंद्र सरकारने ऐनवेळी कच खाऊन भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याला...