" गरजेचे " शिक्षण देण्याची सोय शिक्षण संस्थांनी करावी!
मुंबई / रमेश औताडे
" माणसाला काम नाही " आणि " कामाला माणूस नाही " अशा प्रकारच्या शिक्षणापेक्षा " गरजेचे " शिक्षण देण्याची सोय शिक्षण संस्थांनी करावी. असे मत गोदूताई जांभेकर विद्यालयाच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन यांनी विद्यालयाच्या शतक महोत्सवी सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोदूताई जांभेकर विद्यालय प्रशालेच्या शतक महोत्सव सोहळ्याचे उद्घाटन केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपादजी नाईक यांच्या उपस्थित पार पडला. संस्थेचे सहकार्यवाह श्रीकांत दुग्गीकर यांच्या हस्ते गोदुताईंची पणती प्रज्ञा जांभेकर आणि नात सून नीता जांभेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
गोदुताई जांभेकर यांचे नातू विजय जांभेकर, नात सून नीता जांभेकर आणि पणती प्रज्ञा जांभेकर, संस्थेचे उपाध्यक्ष अँड विलासजी पाटण, अँड विजय साखळकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक राजन मलुष्टे तर सूत्रसंचालन संजना तारे आणि आभार अनिल चव्हाण यांनी मानले.
000
Comment List